Wednesday, May 4, 2016

" प्रयास "

कुणावर करायचा विश्वास
चालतात कथी जोरात श्वास ।
कधी नुसतेच होती आभास
मात्र मनात एकच  ध्यास ।
कर परत एकदा तु प्रयास
येउन पडेल यशाची आरास ।
Sanjay R.

Saturday, April 30, 2016

" कुछ वादे कुछ इरादे "

भावनांना नसते भाषा
तयासी प्रेमाची आशा ।
सोडुनी सार्या निराशा
धावते मन दशदिशा  ।
Sanjay R.

कभी उनकी यादे
कभी उनके वादे  ।
दिलमे न कोइ उमंग
न रहे कोइ इरादे ।
जिते जागते है हम
पिठपर बोझ लादे ।
अबभी चाहते उनको
कोइ उन्हे याद दिलादे ।
Sanjay R.

Thursday, April 28, 2016

" हातात हात "

घे मी दीला
तुझ्या हातात हात ।
हवी मज तुझी
आयुष्याची साथ ।

आकाशाला जशी
चांदणयांची साथ
सुर्याच्या साक्षीन
रोज होते प्रभात ।

तुच ठसली बघ
माझ्या मनात ।
आठवते तुच मज
प्रत्येक क्षणात ।
Sanjay R.

" उन्हाच्या झळा "

का रे बाळा
रडतो घळघळा ।
तहानेन॓ कोरडा
पडला  गळा ।
त्यासी हवा
बरफाचा गोळा ।
गार गार थंड
लाल पिवळा ।
होइल शांत
मनातल्या कळा ।
sanjay R.

उन्हाची एक दुपार
पाण्याविन गळा सुकलेला ।
येताच समोर एक कोन
गळा थंड ओला जाणवला ।
Sanjay R.

Wednesday, April 27, 2016

" स्वप्नांची दुनीया "

चल जाउन येउ आपण सखे
स्वप्नांच्या अनोख्या दुनियेत ।
तु मी आणी सोबतीला चंद्र
आनंदोत्सव करु साजरा
चांदण्याच्या बागेत ।
sanjay R.

काय सांगु राजेहो
काल अख्खा दिवस
उन्हात फिरलो ।
गरमीनं चांगला
गरम गरम शिजलो ।
घामाच्या धारायनं
बंदाच भिजलो ।
रातच्यानं तापानं
चांगलाच फनफनलो ।
लय बेकार हाये उन
बंदा दिवस गरगरलो ।
Sanjay R.