Wednesday, April 27, 2016

" स्वप्नांची दुनीया "

चल जाउन येउ आपण सखे
स्वप्नांच्या अनोख्या दुनियेत ।
तु मी आणी सोबतीला चंद्र
आनंदोत्सव करु साजरा
चांदण्याच्या बागेत ।
sanjay R.

काय सांगु राजेहो
काल अख्खा दिवस
उन्हात फिरलो ।
गरमीनं चांगला
गरम गरम शिजलो ।
घामाच्या धारायनं
बंदाच भिजलो ।
रातच्यानं तापानं
चांगलाच फनफनलो ।
लय बेकार हाये उन
बंदा दिवस गरगरलो ।
Sanjay R.

Friday, April 22, 2016

" धाव धाव विठ्ठला "

सुर्यासंगे अवतरल्या
उन्हाच्या तप्त ज्वाळा ।
लोपला नदी किनारा
सरला आवाज खळखळा ।
सुकला हिरवा पसारा
भासे पाण्यावीन पांगळा ।
दाना पाणी सरले सारे
ओरडे पोटात कावळा ।
संपले सारे उपाय
महाग झाला आवळा ।
गरीबाचा नाही आता
उरला कोणी मावळा ।
धाव धाव विठ्ठला
तुच माझा रे सावळा ।
Sanjay R.

" गंध की पुकार "

कभी आर
कभी पार ।
भटकता
द्वार द्वार ।
भवरेको देखो
गंध की पुकार ।
छुते चुमते
तितली का प्यार ।
जिवन का रंग
खुशीयोकी बहार ।
Sanjay R.

Thursday, April 21, 2016

" घर "

राहण्यास नाही घर
राहतो अंथरुन पदर ।

उपाशी पोट आमचे
नाही कुणास कदर ।

कष्टाला नाही किंम्मत
जगतो करुन मरमर ।
Sanjay R.

" नको धावा धाव "

नको जास्त हाव
नको धावा धाव ।
खाउ देनं त्याला
फुकटचा भाव ।
नाही तरी नेहमी
असते काव काव ।
म्हणतो देवास
मला तु पाव ।
लांब आहे त्याचा
जन्मा चा गाव ।
कोण कुठला
कुणास ठाउक राव ।
येउन बसला
बनला साव ।
विचारलं तर
सांगत नाही नाव ।
द्या ना टाकुन
करुन डाव डाव ।
भरेल मनावरचा
खोल झालेला घाव ।
बरीच कामं आहेत
चला जाउ राव ।
Sanjay R.