सुर्यासंगे अवतरल्या
उन्हाच्या तप्त ज्वाळा ।
लोपला नदी किनारा
सरला आवाज खळखळा ।
सुकला हिरवा पसारा
भासे पाण्यावीन पांगळा ।
दाना पाणी सरले सारे
ओरडे पोटात कावळा ।
संपले सारे उपाय
महाग झाला आवळा ।
गरीबाचा नाही आता
उरला कोणी मावळा ।
धाव धाव विठ्ठला
तुच माझा रे सावळा ।
Sanjay R.
Friday, April 22, 2016
" धाव धाव विठ्ठला "
" गंध की पुकार "
कभी आर
कभी पार ।
भटकता
द्वार द्वार ।
भवरेको देखो
गंध की पुकार ।
छुते चुमते
तितली का प्यार ।
जिवन का रंग
खुशीयोकी बहार ।
Sanjay R.
Thursday, April 21, 2016
" घर "
राहण्यास नाही घर
राहतो अंथरुन पदर ।
उपाशी पोट आमचे
नाही कुणास कदर ।
कष्टाला नाही किंम्मत
जगतो करुन मरमर ।
Sanjay R.
" नको धावा धाव "
नको जास्त हाव
नको धावा धाव ।
खाउ देनं त्याला
फुकटचा भाव ।
नाही तरी नेहमी
असते काव काव ।
म्हणतो देवास
मला तु पाव ।
लांब आहे त्याचा
जन्मा चा गाव ।
कोण कुठला
कुणास ठाउक राव ।
येउन बसला
बनला साव ।
विचारलं तर
सांगत नाही नाव ।
द्या ना टाकुन
करुन डाव डाव ।
भरेल मनावरचा
खोल झालेला घाव ।
बरीच कामं आहेत
चला जाउ राव ।
Sanjay R.
Wednesday, April 20, 2016
" डोळा अश्रु विनाच रडला "
रीश्तो की डोर ।
उसमे कितना जोर ।
हम आप और
जिंदगीका दौर ।
Sanjay R.
जिवन म्हणजे काय
जन्म आणी म्रुत्यच ना ।
येणार्याला जायचच आहे
थांबणार कोण सांगा ना ।
असे करा तसे करा
तुम्हा वाटेल तसे करा ना ।
नका विसरु माणुसकी
माणुस म्हणुन जगा ना ।
Sanjay R.
उन्हाचा मारा वाढला
गरमीचा पारा चढला
गळा कोरडा पडला
थेंब पाण्याचा दडला
दाही दिशा हाहाकार घडला
डोळा अश्रु विनाच रडला
Sanjay R