Wednesday, August 19, 2015

गीत

चला घेउ या
दरशन नागोबाचे ।
गोड धोड करंजी
कीती सारे फराळाचे ।
दिवस हे श्रावणाचे
मनात झोके आनंदाचे ।
Sanjay R.

जाउ दे जगात कुठेही ।
कसा कितीही कुठला काऴ ।
होइल का असे कधी  ।
आई वीणा सांगा कसे  ते बाळ ।
Sanjay R.

गीत

चला घेउ या
दरशन नागोबाचे ।
गोड धोड करंजी
कीती सारे फराळाचे ।
दिवस हे श्रावणाचे
मनात झोके आनंदाचे ।
Sanjay R.

जाउ दे जगात कुठेही ।
कसा कितीही कुठला काऴ ।
होइल का असे कधी  ।
आई वीणा सांगा कसे  ते बाळ ।
Sanjay R.

Tuesday, August 18, 2015

" अनमोल आनंद "

बघुनी तस्वीर तुझी
जडतो मज एक छंद ।

लीन होतो छवीत
जुळतात मनाचे बंध ।

दरवळतो चहु ओर
तुझ्या असण्याचा गंध ।

विसर पडतो जगाचा
मग होतो मी बेधुंद ।

ह्रुदयी वसतो चेहरा तुझा
मिळतो अनमोल आनंद ।

नेत्रांतुन ओथंबतो
मग त्रुप्तीचा परमानंद ।
Sanjay R.



आठवण
अस्वस्थ होतं मन
आठवण जेव्हा होते तुझी ।

का इतकं छळतेस मला
बसली ह्रुदयात छवी तुझी ।

नजर तुझी तीक्ष्ण बाण
घायाळ अवस्था झाली माझी ।

तहान भुक हरपली आता
शुद्ध तुजवीण नाही कशाची ।
Sanjay R.

Friday, August 14, 2015

" श्रावण बहार "


जिकडे तिकडे
पाणीच पाणी ।
चला गाउ या
पावसाची गाणी ।

फुलला गुलाब
रंगाची उधळण ।
मोगरा बहरला
सुगंधीत छान ।

ओली ओली झाली
झाडांची पानं
आनंदानं डोलती
सार् यांची मनं ।

आभाळाची गर्दी
आकाशी झाली ।
पावसानं चींब
धरा ही केली ।
Sanjay R.

श्रावणातली बहार
नवरंगांची किनार ।
कधी पावसाची धार
कधी उन्हात तुशार ।
Sanjay R.

Wednesday, August 12, 2015

" हास्य तुझे "

हास्य तुझ्या
चेहर्यावरचं ।
नजरेतही
जादु अनोखी ।

मन। झालं
वेडं पीसं ।
खुणावते मज
रात्र काळोखी ।

चंद्र पुनवेचा
आभाळात ।
चमचमती चांदणी
अंतरात सखी ।
Sanjay R.