Friday, August 14, 2015

" श्रावण बहार "


जिकडे तिकडे
पाणीच पाणी ।
चला गाउ या
पावसाची गाणी ।

फुलला गुलाब
रंगाची उधळण ।
मोगरा बहरला
सुगंधीत छान ।

ओली ओली झाली
झाडांची पानं
आनंदानं डोलती
सार् यांची मनं ।

आभाळाची गर्दी
आकाशी झाली ।
पावसानं चींब
धरा ही केली ।
Sanjay R.

श्रावणातली बहार
नवरंगांची किनार ।
कधी पावसाची धार
कधी उन्हात तुशार ।
Sanjay R.

No comments: