Tuesday, August 25, 2015

रंग ना रुप

रुप ना रंग म्हने
चाल माया संग ।
राजे हो तोरा पाहुन तीचा
झालो मी दंग ।
नाही मनलं तरी
झाला पिरेम भंग ।
आता करतं काय बाबु ।
सांगलं बावाजीनं
लगन कराचं तिच्याच संग ।
हुंड्या च्या पुढ
कोन पायते रंग ।
शिकल्या सवरल्यावानीच
हाये ना तीचा ढंग ।
कोनीबी पाहीन तीले
त होइन ना दंग ।
इचार नको करु
जनमभर तुले देइन संग ।
Sanjay R.



अंधार् या रात्री
चांदण्यांची झुलं ।
चांदोबाच्या कानात
चंद्रीकेचे डुल ।
दिवसाला आकाश
निळ॓ निळं खुलं ।
फुलली अंगणात
मोगर् याची फुलं ।
चहुकडे पसरली
सुगंधाची शालं ।
Sanjay R.

No comments: