Tuesday, August 11, 2015

" हसरत मेरी "

हसरत है दिलमे
चांद को पानेकी ।
चांदसा चेहरा आपका ।
उसीमे खो जानेकी ।

झुम उठते हम
तेरी हर अदा देखके ।
मन भी मुस्कुराता
बस यादोमे आपके ।

कैसे कहे हम आपको
कछभी न रहा अब बसमे ।
खोना भी नही चाहते
हर सांस हवाले आपके ।
Sanjay R.

असतील कदाचीत
पुर्व जन्माचे बंध ।
या जन्मात अजुनही
दरबळतो त्याचा गंध ।
दे सोडुन विचार सारे
होउ या जिवनात धुंद ।
आहेत दुखः डोंगरभर
त्यातुनच उचलु आनंद ।
Sanjay R.

कैसे कहु तुझे मै दिलकी बात
यादोमे जब मै खो जाता हु ।
तु मुझमे और मै तुझमे साथ साथ
तेरेही सपनेमे मै सो जाता हु ।
Sanjay R.

Saturday, August 8, 2015

पावसाची हजेरी

तीन दिवस पावसानं
दिली सतत हजेरी ।
धरेनही घेतली भरुन
गर्भात पाण्याची तिजोरी ।
सुखावला बळी राजा
सैल झाली तणावाची दोरी ।
पुढच्या कामी लागले सारे
विखुरला आनंद घरोघरी ।
Sanjay R.

कुठे कठे आहे
पावसाचा कहर ।
ओसंडुन वाहताहेत
रस्त्यांमधुन नहर ।
कुठे थकली भागली
बळीराजाची नजर ।
Sanjay R.

Friday, July 31, 2015

" कहर पावसाचा "

कुठे कठे आहे
पावसाचा कहर ।
ओसंडुन वाहताहेत
रस्त्यांमधुन नहर ।
कुठे थकली भागली
बळीराजाची नजर ।
Sanjay R.

Thursday, July 30, 2015

" गीत आनंदाचे "

सार बाजुला तु मनातले
वादळ तुझ्या विचारंचे ।
सोबतिला आहे मीच
बंध जशे या आयुष्याचे ।

आकाशात कितीक  तारे
क्षण भर वेचायचे ।
गजरे करुन चांदण्यांचे
केसांत तुझ्या माळायचे ।

बहरेल गंध जिवनात
फुल जशे मोगर्याचे ।
तुझी माझी प्रीत बघ
गित किती आनंदाचे ।
Sanjay R.

मनात विचारांचं काहुर ।
मग जातय कधी दुर दुर ।
तारांगण फिरुन येता  ।
स्वप्न होतात चुर चुर ।
Sanjay R.










Sunday, July 26, 2015

" मनातले वादळ "

सख्या चिंब भिजले मी
पावसाचा खेळ सारा ।
अशांत कीती झाले बघना
मनात उठले वादळ वारा ।

खुणावतो स्पर्श मजला
वेडा पिसा देह सारा ।
शोधते मी नजरेत आता
काळोखात चमकता तारा ।

अंतरात या पेटली धुंद
हवी मजला शितल धारा ।
श्वासांचे तु मिलन होउ दे
मनः शांतीचा भावच न्यारा ।
Sanjay R.