Thursday, July 23, 2015

" होउ दे भजी "

येउ दे पाउस
कितीही जोरात ।
पडु दे त्याला
त्याच्याच तोर्यात ।
येउ दे पाणी
वाहु दे पुरात ।
मुलांना करु दे
मस्ती दारात ।
फाटकी छत्री
मी बसतो घरात ।
गरमा गरम भजी
होउ दे जोरात ।
Sanjay R.
☔☔☔��☔☔☔

" बरस रे पावसा "

बरस रे पावसा
खुप तु बरस ।
शांत कर धरा
झालं आता वरस ।
घेउन ढगांना
थोडा तु गरज ।
आम्ही आहोत खाली
थांबु नको वरच ।
लोटु दे पुर
येउ दे धारच ।
सारेच थकलो
आहे तुझी गरज ।
आनंदानं हसायला
हवी तुझी सरच ।
Sanjay R.

" कडकडाट तीचा "

रात्री तीनं तर
उच्छादच मांडला ।
सारखी मधुनच
कडाडत होती ।
लखलखाट तिचा
घाबरवत होती ।
सोबतीला त्यचाही
गडगडाट होता ।
भितीचं वातावरण
जिवात जीव नोता ।
रात्र अंधारी आणी
पावरही नव्हता ।
मधेच काही सरींनी
रडुन घेतलं ।
बळीराजानं मनात
हसुन घेतलं ।
Sanjay R.

Wednesday, July 22, 2015

" साथ हवी "

काट्यात फुलणारा गुलाब
काळोखात बहरणारा निशीगंध
चिखलात सजणारा कमळ
मनात दरवळणारा सुगंध
सार्यांना साथ हवी एकच
आनंदानं झुलणार्या त्या प्रितीची ।
Sanjay R.

" रिंगण "

मनान हळुच दुर बघायचं
शब्दांना थोडंच उलगडायचं ।
हळुवारपणानं थोडं जुळवायचं
आनंदाला बघ असच जपायचं ।
Sanjay R.

नकोच सांगु शब्दात ।
अनमोल तुझ्या भावना ।
मन नाही दगड ।
तुझी तुलाच सांत्वना ।
Sanjay R.

आयुष्य माणसाचं
आहे गोल रिंगण ।
मी ही त्यातलाच
नाही त्यासी अंगण ।
दुर त्याच्या हाती
जिवनाचा कणन कण ।
सुरुवात होते जिथुन
संपतो तिथेच क्षण ।
तरी मी चा तोरा
जगतो घेउनच जिवन ।
Sanjay R.