Saturday, June 27, 2015

प्रवास

लोकलचा प्रवास
टायमाचा ध्यास ।
रोज रोज तेच पण
तरीही असतो खास ।
Sanjay R.
������������

सोचा था मैनेभी
करु एक कवीता ।
भुल गया सबकुछ
जब आ टपकी सवीता ।

चाहता तो मै खुब था
पढुंगा आरामसे मै गीता
क्या पता मुझेभी
मीली है साथ उसके सीता
Sanjay R.

Friday, June 26, 2015

रंग तरंग

सुचव तु मज काही
उलगड अंतर मन ।
तुझ्या माझ्या कवितेस
देउ या एक क्षण ।
Sanjay R.

घेउन तुज मिठीत
स्पर्श तो मज हवा ।
मी आणी तु फक्त
उधळु गंध नवा ।
Sanjay R.

का कुणास ठाउक
झाले मन अशांत ।
सांग तुच आता
बसु कसा निवांत ।
Sanjay R.

फुलांचे रंग
मनातले तरंग ।
भिजाया चला
पावसात संग ।
Sanjay R.

Saturday, June 13, 2015

आला पाउस

कधी स्तुती ।
कधी अनुभुती ।
व्यक्ती तितक्या प्रव्रुत्ती ।
जपतोच ना आपण
सार्या स्म्रुती ।
का कुणास ठाउक
नकोत चांगल्या क्रुती ।
चांगल्या असो वा वाइट
जगण्याच्या तर
अशाच रीती ।
झेलुनी दुखः
हसायच कीती ।
Sanjay R.

आला बघा पाउस आला
चला जाउ या भिजायला ।
निसर्गाचे होइल नवनिर्माण
टाकायचे बीज रुजायला ।
फुलेल हिरवळ चहु ओर
आनंदात आम्हा जगायला ।
Sanjay R.

सुखदुखः आहेत का कमी
नको मज सुखाची हमी
सोबत तुझी असतांना
कुठे मज कशाची कमी
Sanjay R.

Thursday, June 4, 2015

श्रद्धा

देवात माझी श्रद्धा आहे
नाही ती फक्त अंधश्रद्धा ।
पुजा मी ही करतो आणी
माझ्यतला मी जागवतो ।
करुनी पुजन मी देवाचे
आत्मविश्वास मी वाढवतो ।
विचार नसतो मनात कधी
आनंदान जयपराजय
मी स्विकारतो ।
Sanjay R.

हा एकच जन्म भासतो
सात जन्मा इतका ।
परत परत हवा कशाला
फेरा नकोच मजला इतका ।
Sanjay R.

जागा असतो मी ना
लक्षच लागत नाही कुठ ।
बघत असतो दुर नी
मनात आवळतो मुठ ।
शांत मिटतो डोळे मग
शब्द पडतात कानी
बाळा उठ बाळा उठ ।
प्रेम आईच आठवत
क्षणात सुखाची लुट ।
Sanjay R.

मन असतं एक
रंग त्याचे अनेक ।
सुख दुखाःनी भरलेला
आहे कप्पा प्रत्येक ।
Sanjay R.

Monday, June 1, 2015

जिवनार्थ

काय असावा
जिवनाचा अर्थ ।
दिवसा मागुन
दिवस गेलेत ।
हसलो रडलो
कीती सार्थ ।
केला परोपकार
कधी स्वार्थ ।
जगलो मेलो
झाले निरर्थ ।
Sanjay R.