बाळा मी तुझी नी तु माझा
नाही रे दुर इथे कोणी ।
बिंबवल मनात तुज
गाते अंगाईची गाणी ।
होइल रे मनातल सार
आहेस तु मोठा गुणी ।
प्रेम माझे तुझ्या सये
माझ्या गळ्यातला तु मणी ।
Sanjay R.
बाळा मी तुझी नी तु माझा
नाही रे दुर इथे कोणी ।
बिंबवल मनात तुज
गाते अंगाईची गाणी ।
होइल रे मनातल सार
आहेस तु मोठा गुणी ।
प्रेम माझे तुझ्या सये
माझ्या गळ्यातला तु मणी ।
Sanjay R.
चढला सुर्य डोक्यावर
उन आल दारावर ।
तरी थंडी म्हणे मीच
स्वेटर असु दे अंगावर ।
Sanjay R.
पारा थंडीचा
जास्तच घसरला ।
गार पाण्यात
हात ओला ।
स्वेटर ब्लॅकेट
टोपरे कानाला ।
कप चहाचा
आनंदी झाला ।
शेकोटीला
कचरा मिळला ।
आइस क्रीमचा
स्वाद पळाला ।
गरम भजीचा
नास्ता आला ।
हु हु हु हु आता
सांगु कुणाला ।
Sanjay R.
सकाळ येयी घेउन आनंद ।
नव्या आशा नव्या आकांक्षा ।
पुरी करायची स्वप्न आता ।
संपली सारी प्रतीक्षा ।
Sanjay R.
जाग मीत्रा जाग ।।
करु नको मला ट्याग
वाॅलवर माझ्या होते भागमभाग ।
मलाही येतो याचा राग
नाही तर करील तूझा त्याग ।
जाग मित्रा जाग ।।
Sanjay R.
आज ना मुलाकात होगी
नाही कोइ बात होगी ।
ढल चुकी शाम अबतो
बस अभी रात होगी ।
बित गया वक्त अभी
सपनोभरी निंद होगी ।
रोशनी होगी सुबह जब
मुलाकात बस तभी होगी ।
Sanjay R.
माणुसच माणसाचा
कसा दुष्मन झाला ।
नारपराधांची नाही
उरली तमा त्याला ।
रणांगणात लढण्याचे
उरले नाही सामर्थ्य ।
लपुन छपुन मारायचे
यातच त्यांचा स्वार्थ ।
रक्तपात घडवायचा
एवढेच त्यांचे उद्दीष्ट ।
अविचारी झालेत ते दुष्ट
अभागी मात्र भोगतो कष्ट ।
पांढरा स्वच्छ शांतीध्वज
शरमेन लाल झाला ।
नाही उरली दया माया
माणुसच माणसाचा वैरी झाला ।
Sanjay R.
नाही तुज मी
निराश करणार ।
नाही तुज मी
दुर सारणार ।
जीव जडला
तुजवर माझा ।
असा कसा मी
तुला सोडणार ।
Sanjay R.
चित्रावरुन तुझ्या
मज एक कवीता सुचते ।
सुरेख कीती तु
हवी हवीशी दिसतेस ।
गोड मधुर ते हास्य तुझे
जशी गुलाबाची कळी खुलते ।
दुर भरारी घेउनी मन
तुझ्याच मनात जाउन झुलते ।
Sanjay R
नाही धरवत धीर आता
आठवणींचा डोंगर झाला मोठा ।
प्रत्येक क्षण एक युगाचा
दिसे दिवस रात्र तुच स्वप्नपटा ।
Sanjay R.