Tuesday, December 16, 2014

" कळी "

नाही तुज मी
निराश करणार ।
नाही तुज मी
दुर सारणार ।
जीव जडला
तुजवर माझा ।
असा कसा मी
तुला सोडणार ।
Sanjay R.

चित्रावरुन तुझ्या
मज एक कवीता सुचते ।
सुरेख कीती तु
हवी  हवीशी दिसतेस ।

गोड मधुर ते हास्य तुझे
जशी गुलाबाची कळी खुलते ।
दुर भरारी घेउनी मन
तुझ्याच मनात जाउन झुलते ।
Sanjay R

नाही धरवत धीर आता
आठवणींचा डोंगर झाला मोठा ।
प्रत्येक क्षण एक युगाचा
दिसे दिवस रात्र तुच स्वप्नपटा ।
Sanjay R.

Monday, December 15, 2014

" ढगांच्या आड "

पाठशीवणीचा खेळ खेळतो
लपतो ढगांच्या आड ।
थकले वाट बघुन त्याची
कोमेजले बघ ते झाड ।
Sanjay R.

आठवणीत असा तुझ्या
क्षण एक एक जातो ।
सोबत असताना तुझ्या
स्वतःलाही विसरुन जातो ।

आली थंडी पडला पारा
गार गार झोंबतो वारा ।
अंगावरती करतो मारा
कुडकुडतो हा पसारा ।
Sanjay R.

Sunday, December 14, 2014

" विश्वास "

पर्वतरोही सारे आपण
सर करायचा आहे गड ।
मनात आत्मविश्वास हवा
कहीच जाणार नाही जड ।
Sanjay R.

अपने ना रुठे कभी
इरादे ना हो झुटे कभी ।
बात ना रुके कभी
दिल ऐसे ना तुटे कभी
Sanjay R.

Thursday, December 11, 2014

" ओझं "

भुत संशयाच
मानगुटीवर बसल ।
गाडं जिवनाचं
तिथच फसलं ।
भोगायच स्वता:लाच
कोणी कितीही हसलं ।
नशीबाचा खेळ सारा
कुणास ठाउक का ते रुसलं ।
लपवतो सारी दुखः
ह्रुदयात बघा सारच ठुसलं ।
Sanjay R.

मणभर ओझ घेउन डोक्यावर
निघतो रोज मी जगायला ।
थकलो कुठ ठेउ ओझ आता
मंद झालेत श्वास तरायला ।
Sanjay R.

Wednesday, December 10, 2014

" खडे जिवनातले "

मनात नाही काहीच
नजर लागली शुन्याकडे ।
असतांना लहान आम्ही
गिरवायचो खुप पाढे ।
वाटत चुकल असेल गणीत
जिवनात आहेत कीती खडे ।
सुख: दुख : सोबती इथे
जुळवायचे  इथे आयुष्यातील तडे ।
Sanjay R.


कशातच नाही लागणार
अशान मन माझं ।
सदैव असेल प्रतिक्षा मज
केव्हा बदलेल मन तुझं ।
Sanjay R.