Thursday, November 6, 2014

" निर्जन वाटा "

अगणीत विचारांच
कपाट असत ह्रुदय ।
भुत भविष्य यांच
भंडार असत ह्रुदय ।
हास्योनंदाच
कोठार असत ह्रुदय ।
आसवांच भरलेल
गंगाळ असत ह्रुदय ।
जहाल विष पचवणार
श्टमक असत ह्रुदय ।
छोट्यश्या धक्क्यान
तडकणारा काच असत ह्रुदय ।
Sanjay R.

दुरवर पसरलेल्या
सागराच्या अथांग लाटा ।
कधी निर्जन पहुडलेल्या
भकास वाटा ।
अजुनही सलतो तो
खोलवर रुतलेला काटा ।
खुप रडुन घेतल आता
ठरला एक एक अश्रु खोटा ।
नाही उरल्या आता मनात
कुठल्याच रंगांच्या छटा ।
Sanjay R.

Friday, October 31, 2014

" देवा तुझीच रे माया "

देवा तुझीच रे माया
तुझीच इच्छा ।
आम्हा क्रुपा द्रुष्टी लाभु दे
हीच सदीच्छा ।

करता करविता
तुच रे देवा ।
आठवतो तुला
हाच अनमोल ठेवा ।

मन उदास आज माझे
कानात कर्कश ढोल वाजे ।
क्रुपा व्रुष्टी होउ दे रे देवा
आभार मनोमन मानील तुझे ।
Sanjay R.

Wednesday, October 29, 2014

" नशिब "

ख्वाइशे हो हजारोमे
करो कुछ थोडासातो
पायेंगे हम लाखोमे ।
नसिब तो बदलता रहता
ना सोचो सीर्फ ख्वाबोमे ।
Sanjay R.

समुद्रा इतक्याच अथांग
इच्छा असतात मनात ।
मिळाले जरी थेंबभर
सुखावतो आपण क्षणात ।
आनंद होतो इतका
की मावत नाही गगणात ।
Sanjay R.

कुणी ना फारच
असतात हट्टी ।
करंगळी दाखवुन
घेतात कट्टी ।
Sanjay R.

Sunday, October 26, 2014

" चिंतेची वारी "

येणार ति म्हणुन
तयारी केली सारी ।
ति आली आणी गेली
विचार आता भारी ।
पगार तर केव्हाच सरला
दिवस रात्र चिंतेची वारी ।
Sanjay R.

अवतरता सुर्यकिरण
निघे अंधार स्रुष्टीचा ।
स्वयंदीप प्रज्वलित होता
निघे काळोख मनाचा ।
Sanjay R.

Friday, October 24, 2014

" दिवाळी झाली "

आली दिवाळी
झाली दिवाळी ।
आवाजात फटाक्याच्या
बसली कानठळी ।
जेवणात मिळाली
गरम पुरण पोळी ।
घरोघरी रोषणाइ
उजळल्या दिपमाळी ।
लाभली आकाशाला
नवरंगी झळाळी ।
Sanjay R.

घेउन तुज मिठीत माझ्या
अनुभवायचा मज स्वर्गसुख ।
तु मी फक्त दोघच असु आपण
झेलायची आता थोडी रुखरुख ।