Monday, September 15, 2014

" मज घडेल काशी "

हास्य वदन घेउनी
नभात अवतरला रवी ।
प्रकाशीत झाली धरा
झळकली आनंदाची छवी ।
Sanjay R.

नको रे देवा
वेळ येउ देउ अशी ।
बापाला बाप म्हणायची
त्यांना का लाज येते अशी ।

लहानाचे केले मोठे
पुरवलेत लाड राहुन उपाशी ।
आयुष्य घातले खर्ची
रात्र रात्र काढल्या उशाषी ।

जडवला घडवला हिरा बनवुन
सम्मानीत केला नावानीशी ।
आई बापच विसरला रे
कसे आता सांगायचे कुणापाशी ।

नाही हव्यास मज पैशा पाण्याचा
तरीही आहे मी उपाशी ।
शब्द दोन प्रेमाचे दे
नाही कुठले रुण घडेल काशी ।
Sanjay R.

देवा खरच तुझी
किमया न्यारी ।
पहीले तर बळिराजाची
वाया घालवलीस तयारी ।
आता केलीस रे
धरा जलमय सारी ।
प्राणही काढुन नेलेस
का सारेच होते अनाचारी ।
देवा तुझी किमयाच न्यारी ।।
Sanjay R.




Sunday, September 7, 2014

" आनंदाचे क्षण "

आनंदाचे क्षण
घालवायचे कशाला ।
दुक्खाःचे क्षण
बोलवायचे कशाला ।
खळखळीत हास्य
दडवायचे कशाला ।
डोळ्यात अश्रु
घडवायचे कशाला ।
जिवन अनमोल
दवडायचे कशाला ।
Sanjay R.

" चिव चिव चीऊ "

मोहब्बत जुदाइ का
ही एक नाम है ।
बस अब खुदासे
मोहब्बत का अरमान है ।
दुर रहो दिवानगीसे
यही उसका फरमान है ।
जिओ जिंदगी मोहब्बतसे
यही जिवन ज्ञान है ।
Sanjay R.

चिव चिव चिउ
काव काव काउ ।

येना रे भाऊ
गित एक गाऊ ।

म्हणे बाळुची आई
चित्रच पाहु ।

झाडंही नाहीत
कुठे मी राहु ।

घनदाट जंगल
चला आता लाऊ ।

तिथेच जाउन
गोड गित गाऊ ।
Sanjay R.

Saturday, September 6, 2014

" वेड्या मनाची काय ही कथा "

ख्वाब हो अगर दिलमे ।
सब कूच दिल को भाता है ।
सोचो जो भी आप ।
सामने बस आ जाता है ।
Sanjay R.


मिळता दाद कवितेला
मुठभर मास चढते आम्हा ।
लिहून परत एकदा
ऐकवतो बघा तुम्हा ।
Sanjay R.


वेड्या मनाची काय ही कथा ।
जिथे जिथे जाईल
तिथे आपलीच व्यथा ।
कधी बघत बसेल वाटा ।
‘तर कधी पिटत बसेल माथा ।
काय मनात त्याच्या कुणास ठाव ।
लिहायची म्हटल तर होईल गाथा ।
Sanjay R.

गालावर तूझ्या
काळ्या केसांची बट ।
घायाळ करी मज
नजरेचा कट ।
Sanjay R.

Thursday, September 4, 2014

" देवा सुखाचे बाळकडु दे "

देवा काय मागायच तुला ।
तुझ्या पुढ हात फक्त जोडु दे ।।
प्रत्येकाच्या मनात
असेल नसेल जर काही ।
देवा तु तसेच सारे घडु दे ।।
पायाशी तुझ्या मागेल कोणी ।
कळसा कडे त्यासी वर चढु दे ।।
नको मजसी काहीच ।
सगळ्यांना सुखाचे बाळकडु दे ।।
Sanjay R.