Thursday, September 4, 2014

" देवा सुखाचे बाळकडु दे "

देवा काय मागायच तुला ।
तुझ्या पुढ हात फक्त जोडु दे ।।
प्रत्येकाच्या मनात
असेल नसेल जर काही ।
देवा तु तसेच सारे घडु दे ।।
पायाशी तुझ्या मागेल कोणी ।
कळसा कडे त्यासी वर चढु दे ।।
नको मजसी काहीच ।
सगळ्यांना सुखाचे बाळकडु दे ।।
Sanjay R.

" हातात हात "

होती तुझी साथ
हातात होता हात
नव्हते जे मनात
घडले सारे क्षणात ।
Sanjay R.

चांदण्या रात्री
बघते चांदणी वाट ।
हळुच डोकावतो चंद्र
घेउनी पौर्णिमेचे ताट ।
Sanjay R.


" मोरया "

मंगल मुर्ती मोरया ।
गजानना लंबोदरा ।
विनायका सिद्धेश्वरा ।
तुम्हीच आता क्रुपा करा ।
दुराचारी बहु आनंदी 
व्यथीत झाली  ही धरा ।
सिंचीती कष्टकरी घाम
दुखः तयांची तुमहीच हरा ।
Sanjay R.

दुआ हम भी मांगेंगे भगवानसे
भर दे दामन आपका खुशीयोसे
हसरते पुरी हो आपकी शानसे
हो सकेतो मिला दे अपनी जानसे ।
Sanjay R.


Tuesday, September 2, 2014

" निशास्वप्न "

तस्वीर तुझी बघुन
मनाला मी समजवतो ।
तुच स्वप्नपरी माझी
निशास्वप्न मी सजवतो ।
Sanjay R.

प्रत्येक अदा तुझी
खुणावते मनाला माझ्या ।
बेधुंद मन होत
स्थिरावत विचारांत तुझ्या ।
Sanjay R.

Sunday, August 31, 2014

" आधाराला नको काठी "

कविता ही माझी
आहे तुझ्या साठी
नाते मैत्रीचे आणी
प्रेमाच्या गाठी ।
तु आहेस माझी
मी तुझ्या साठी ।
प्रवास आयुष्याचा
आधाराला नको काठी ।
Sanjay R.

दुखाःचा महा डोंगर तु
आयुष्यभर झेललास ।
सुख वाट बघतय बघ
वेळ नाही होणार खलास ।
Sanjay R.

कुठ कडमडलीस
कुठ धडपडलीस
ठाउक नाही मला ।
बर झाल आता
हाती डाॅक्टरच्या
तु सापडलीस ।
प्रयत्न शर्थीचे
करील तो
सोडणार नाही तुला ।
Sanjay R.

सोबत तुझी लाभली मजशी ।
लोपले दुखी बंध बघ वेदनेशी ।
द्विगुणीत आनंद नाते तुजशी ।
न उरे लालसा तुच मजपाशी ।
Sanjay R.

कुणाला म्हणायच आपलं
आणी कोण आहे परकं
फरक करण फारच कठीण
आपलेच देतात दगा तेव्हा
सरकते वाळु पाया खालुन
परकेच वाटतात आपल म्हणुन ।
Sanjay R.