Sunday, August 3, 2014

" का असा वागलास तु "

दुनियामे कमी नही है लोगोंकी ।
लाइन लंबी लगी है रिश्तेदारोंकी ।
पुछताछभी कर लेते सब अपनोकी ।
काम तो दोस्तही आते कसम दोस्तीकी ।
Sanjay R.

न्याय अन्यायाच्या
गोष्टी नकोत आता  ।
अन्याय तुजकडुनच
झाला मजवर ।
स्वतःच्या स्वार्थापोटी
का असा तु वागलास ।
मात निसर्गावर करुन 
प्रसंग भिषण ओढवलास ।
Sanjay R.

व्यथा मनाची 
ना कळे कुणा ।
नव रुपात साकारतो 
आपलेपणा ।
Sanjay R.  

नाते......

रक्ताच नसलना तरी चालेल ।
भावनांच असल तर धावेल । ।
नसेल मोठा पसारा तरी  ।
ह्रुदयाच्या कोपरयात नक्कीच मावेल ।।
Sanjay R. 

Wednesday, July 30, 2014

" आला श्रावण "

चला आता जायच फिरायला
स्कुटर वर बसुन फिरायची
सर यायची नाही कशाला ।
भरुन पेट्रोल निघायचे सफरीला ।
बंदच झाली तर
किक मारायची बिचारीला
Sanjay R.

हलक्या पावसाच्या
सरीसंगे श्रावण आला ।
पसारा धरेवरचा
न्हाउन निघाला ।
किलबील पाखरांची
गार वारा सोबतीला ।
फुलली नाजुक फुलेही
चहुओर गंध दरवळला ।
Sanjay R.

Saturday, July 26, 2014

" प्रवास जिवनाचा "

उसंत नाही क्षणाची
वेळ आहे थोडा ।
प्रवास जिवनाचा हा
बघ मोजुन थोडा ।
Sanjay R.

गप्पा आणी गोष्टींची यादी
मनात आहे लांब ।
जवळ तुच नसतांना 
कुणास सांगु थोड थांब ।
Sanjay R. 

Friday, July 25, 2014

" कविताच रुसली माझी "

गप्पा आणी गोष्टींची
यादी मनात आहे लांब ।
जवळ तुच नसतांना
कुणास सांगु थोड थांब ।
Sanjay R.

मनात आहे खुप
मज तुझ्याशी बोलायच ।
कवीताच रुसली माझी
आता शब्दांना कुठे शोधायच ।
Sanjay R.

ताटकळत अस
किती बसायच ।
वाटेवर डोळे लाउन
कस बघायच ।
वाट संपणार पक्क
म्हणुनच आहे जगायच ।
Sanjay R.

Saturday, July 19, 2014

" बळीराजा त्रस्त "

काला है अंधेरा
उसका दिल भी कला ।
देखे सुरज जबभी
झुम उठता उजाला ।
Sanjay R.

पावसालाही कळल दिसत
नको तिथ बरसतो मस्त ।
वाट पाहताहेत शेतं तळी
बळीराजा झालाय त्रस्त ।
Sanjay R.

देखो जिंदगी
है ये मेहमान ।
कब निकल ले
पता नही ।
जब तक है
साथ अपने ।
कर लो
पुरे अरमान ।
Sanjay R.