Sunday, June 22, 2014

" चला जाउ पंढरीला "

चला जाउ पंढरीला
विठोबाच्या दर्शनाला ।
घोश करु या नामाचा
टाळ म्रुदंग संगतीला ।
झंडे पताके घेउ हाती
हाक देउ चंद्रभागेला ।
हरपली आता तहान भुक
हरी माझा मदतीला ।
विसावत नाही पाय
उचलुन धरीले पालखीला ।
जय जय विठ्ठल
श्री हरी विठ्ठल ।
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल ।
Sanjay R.


कमरेवरी ठेउनी हात

वाट पाहतो विठु माझा ।

वारीसंगे निघालो आता 

आनंद कुठे ठेउ माझा ।

Sanjay R.



Saturday, June 21, 2014

" मन नाखुश "

मनाचा मनावर नाही अंकुश
ब्रम्हांड फिरेल तरीही नाखुश ।
झुरेल थकेल होइल क्रुश
जुळले तरच होइल खुश ।
Sanjay R.

क्या कितना नसीब पाया हमने  कुछ सोचो तो आप सामने होती है । खो जाते है यादोमे कभी तो  यादे अक्सर आपकी होती है । Sanjay R.  ।

" ओठ आमचे "

काहींनी खाउन गोबर केले
रिकाम्या वाट्या रिक्कामे प्याले ।
रंगित पोष्टर खुप रंगवले
सुंदर फोटो त्यावर चिपकवले  ।
झाले गेले नशीबी आले
ओठ आमचेच कोरडे झाले ।
Sanjay R.

Wednesday, June 18, 2014

" पावसाच्या धारा "

रीमझीम रीमझीम
पावसाच्या धारा ।
संगतीला आहे
थंड थंड वारा ।
काळ्या कुट्ट ढगांनी
व्यापला आसमंत सारा ।
त्रुप्त त्रुप्त होतय बघा
विशाल तापलेली धरा ।
भिजुन घेउ चिंबचिंब
चला पावसात जरा ।
नाचत मुरडत फुलुन जाइल
निसर्गाचा हा पसारा ।
Sanjay R.

Tuesday, June 17, 2014

" तस्वीर "

तस्वीर आपकी भी हम
लगायेंगे ताजमहलमे ।
कबसे लेकर घुम रहे
रक्खी है मनमहलमे ।
Sanjay R.