पावसाच्या सरी
येउन गेल्या दारी ।
सुर्यान आता
लावली हजेरी ।
अशीच राहु दे
उन पावसाची फेरी ।
Sanjay R.
प्रकोप गर्मीचा पाहुन
सुर्यालाही येत असाव
कदाचीत रडायाला ।।
ढगांचा येक समुह
सरसावला पुढे
धरेस शांत करायाला।।
Sanjay R.
पावसाच्या सरी
येउन गेल्या दारी ।
सुर्यान आता
लावली हजेरी ।
अशीच राहु दे
उन पावसाची फेरी ।
Sanjay R.
प्रकोप गर्मीचा पाहुन
सुर्यालाही येत असाव
कदाचीत रडायाला ।।
ढगांचा येक समुह
सरसावला पुढे
धरेस शांत करायाला।।
Sanjay R.
लग्नाचा लाडु
गोड का कडु ।
आधी हास्य
नी आयुष्यभर रडु ।
आधी हळद
नंतर जख्मी पडु ।
गुलाबी स्वप्नात
घ्या हाती झाडु ।
Sanjay R.
बघा बघा आला उन्हाळा
सुर्य ओकतोय नुसत्या ज्वाळा ।।
लाही फुटतेय अंगाची
उन्हात होते पळा पळा ।।
धारा लागल्या घामाच्या
कोरडा पडतोय बघा गळा ।।
Sanjay R.
मनमोहक सुगंध फुलांचा
मंजुळ चिवचीवाट पाखरांचा ।।
नाद मधुर टाळ म्रुदंगाचा
दिवस आजचा आनंदाचा ।।
Sanjay R.
वाटत नेत्यांचे
आता फिरले डोके ।
समाजात आता
खुप माजलेत बोके ।
पावलो पावली
आहेत कीती धोके ।
भरतील ते
परत परत खोके ।
Sanjay R.
चढली त्यांना
इलेक्शनची धुंद ।
होश उडालेत
मती झाली मंद ।
Sanjay R.
झाली सकाळ
बघ सोडली खाट
संपला अंधार दाट
पहातोय तुझीच वाट
घेउन बसलोय पाट
बांधायची आहे नाॅट
Sanjay R.
सक्काळ पासुन उचकी येतेय ।
असेल का ही आठवण कुणाची ।।
कोण करील आठवण आमची ।
फुरसत तरी आहे का त्यांना क्षणाची ।।
Sanjay R.