Saturday, December 3, 2016

" नदीचा किनारा "

रात्र ही फुलायला
सोबतीनं झुलायला ।
स्वप्न तुझी माझी
संगे जगायला ।
Sanjay R.

पाण्याची धारा
नदीचा किनारा ।
सोबत वाहतो
झुळझुळ वारा ।
मी चंद्र आकाशी
आणी तु माझी तारा ।
Sanjay R.

बघुन तुझा हसरा चेहरा
वाटतं मला खुप हसावं ।
सुख दुखाःच्या चार गोष्टी
करत कसं शांत बसावं ।
Sanjay R.

" गजरा "

केसात तुझ्या गजरा
दिसतो किती साजरा
दरवळला दुर सुगंध
भाव चेहर्यावर लाजरा ।
Sanjay R.

No comments: