Saturday, June 30, 2018

" चलाना राया थोडे भिजायला जाऊ "

चलाना राया थोडे भिजायाला जाऊ

रिमझिम पावसात आपण दोघेही न्हाऊ  ।


आकाशात ढगांनी किती गर्दी केली

भरून गेले आभाळ खाली सावली आली ।

चलाना राया थोडे भिजायाला जाऊ

रिमझिम पावसात आपण दोघेही न्हाऊ ।


गार झाला वारा मनी फुलला पिसारा

आठवणींच्या डोहात तुमचाच किनारा  ।

चलाना राया थोडे भिजायाला जाऊ

रिमझिम पावसात आपण दोघेही न्हाऊ  ।


चमचमली वीज कसा लख्ख झाला प्रकाश

अंतरात बघा कसे भरून आले आकाश  ।

चलाना राया थोडे भिजायाला जाऊ

रिमझिम पावसात आपण दोघेही न्हाऊ ।


प्रीत तुमची माझी राया तोडू सारे पाश

येऊ द्या मिठीत मज घेऊ मोकळे श्वास  ।

चलाना राया थोडे भिजायाला जाऊ

रिमझिम पावसात आपण दोघेही न्हाऊ  ।
Sanjay R .


Friday, June 29, 2018

" आसवं कशी पुसायची "

पावसाचा रंग कसा उफाळून आला
काळ्या ढगांनी सूर्य झाकून दिला ।।

वाऱ्यालाही बघा किती जोश आला
सळसळती झाडं कशी घेताहेत झुला ।।

सर सर आल्या सरी आसमंत ओला
लोट निघाले पाण्याचे कुठे नदी नाला  ।।

रिमझिम पावसाने कहरच केला
पुराच्या पाण्यासंगे गाव वाहून गेला ।।

नाही उरले घरदार कुठे आडोशाला
पाणीच पाणी जिकडे तिकडे जीवाचा काला ।।

निसर्गाच्या करणीचा नशिबावर घाला
आसवं कशी पुसायची पदरही ओला ।।
Sanjay R.

Wednesday, June 27, 2018

" वट सावित्री "

सावित्रीने दिला वसा
नवरा तुला हवा कसा ।

आज  मिळाला  जसा
जन्मोजन्मी हवा तसा ।

माणसा तुही सांग जरा
बायको तुला हवी कशी

आत्ता आहे ना ती जशी
तीच हवी जशीच्या तशी ।
Sanjay R.


" हे दिल मेरे सून जरा "

हे दिल मेरे तू सून जरा
शब्द मेरे तू सून जरा
बस तू सून जरा

जो भी कहूँगा अब मै
ध्यान तू अब दे जरा
तू सून जरा

कौन सुनता यहा किसीकी
फट गये है परदे कानके
बस तू सून जरा

न रहा लगाम जुबापे
चाहे जो कह दो कुचभी
बस तू सून जरा

नही पता धमनीयो मे
बहता रक्त या पानी
तू सून जरा

मरने मारनेमे उतारू सब
चैन कबका खो गया
तू सून जरा

बंधी है आखोपे पट्टी
दिखता नही अब कुछ
तू सून जरा

मीट गयी मिट्टीमे इज्जत आब्रू
शरम बचेगी कैसे तू बता
बस तू सून जरा

सोच भी खो गई कबकी
आत्मा भी तो मर गयी
तू सून जरा

लाश बन गया हू अब मै
न जाने दिलभी कब मर गया
बस अब तू सून जरा
Sanjay R.


Sunday, June 24, 2018

" जाऊ थोडं पावसात "

चल ना ग सखे
जाऊ थोडं पावसात ।
पावसाच्या सरी बघू
कशा त्या धावतात ।

बघ जरा आकाशी
ढग आलेत भरून ।
नाचू या दोघंही
हातात हात धरून ।

बरसणार्या या सरीत
घेऊ थोडं भिजून ।
ये ना मिठीत माझ्या
मन घेऊ  रिझवून ।

गडगडतय आभाळ किती
चमचमणारी  वीज बघ ।
हृदयात होतेय धडधड
नेत्रात दिसतंय जग ।
Sanjay R.