Friday, July 11, 2014

" पावसाचा पत्ता नाही "

ढग तर रोजच जमतात ।
पावसाचा पत्ता नाही ।
निसर्ग असा कोपला ।
आता प्यायलाही पाणी नाही ।
Sanjay R.

शिरवा पावसाचा आला
तनी ओलावा जाणवला ।
क्षणीक उत्साह मनात
अंगणी मोगरा फुलारला ।
Sanjay R.

" बजेट जिवनाचे "

ढगांच्या नेत्री
नाही उरले पाणी ।
अवघा देहची आता
सुर्य नारायण चरणी ।
Sanjay R.


जाहिर झाल आज
देशाच बजेट ।
काही झाले आनंदी
काहींनी केले रिजेक्ट ।

टिव्ही मैबाइल कंपुटर
सारे झाले स्वस्त ।
भरायचा आहे आयकर
उणे पाच हजार जास्त ।

सिगरेट बिडी तंबाखु
सोडुन द्या आता ।
डाॅक्टर आणी दवाखाने
धरतील जाता जाता ।

पैसाच नसेल खिशात
चिंता कशाची करता ।
चांगल्या दिवसांची सुरुवात
ठाव नाही काय आहे नशीबात ।
Sanjay R.

Sunday, July 6, 2014

" दुखी: मन माझे "

निघाली आज नभांची स्वारी
बरसणार कधी आमच्या दारी ।

चिंतेत पडले सारे शेतकरी ।
घरात आहे मुलगी आजारी ।

करायची होती पंढरीची वारी ।
का अंत पाहतो पांडुरंग हरी ।

बरसु दे आता पावसाच्या सरी ।
जाउ नकोस दुर फीर माघारी ।

जगलो वाचलो तर करील वारी ।
Sanjay R.

कविता कुणाची प्राण आहे ।
कुणी कवितेचा फॅन आहे ।
कवी स्वत: एक ध्यान आहे ।
कवितेनच त्याचा सन्मान आहे ।
Sanjay R.

Friday, July 4, 2014

" रुप नवे "

चक्र निसर्गाचे बघा
कसे कुणा सांगावे ।
गाण प्रितीचे
हळुच गुणगुणावे ।

गुलाब मोगरा
निशिगंधानेही फुलावे ।
मनमोहक गंध त्यांचा
धुंद धुंद व्हावे ।

निळ्या आकाशी
एकत्रित ढगांनी व्हावे ।
मुसळधार पावसाने
धरेवरी उतरावे ।

लहान थोरांनी
त्यात भिजुनी घ्यावे ।
किलबील पाखरांची
उडती आकाशी थवे ।

खळखळ पाण्याची बघा
तुडुंब भरले तळे ।
फुलुन आली धरा
घेउन रुप नवे ।
Sanjay R.

निघतात ती पाखर
दिवेलागणीला घराकड ।
सुर्यह लोटुन देतो
प्रुथ्वितल अंधाराकड ।
Sanjay R.

Wednesday, July 2, 2014

" आतातरी येउ दे पाउस "

यंदा पावसाने
रचले एक नाटक ।
बळिराजा आकाशी
बघतो एकटक ।
Sanjay R.

आतातरी पाउस येउ दे ।
धरती ओली होउ दे ।
जिवात जिव माझा येउ दे ।
हिरवा निसर्ग आम्हा पाहु दे ।
आनंदात सार्यान्ना न्हाउ दे ।
दोन घास प्रेमान खाउ दे ।
Sanjay R.

चातका परी डोळे लाउनी
बघतोय तो आकाशी ।
नारायणा दुख: आमची
होत आहेत रे भारी ।
लोटुन दे पुर आसवांचा आता
नकोरे सांगु जाण्या फाशी ।
Sanjay R.

टोचलेला काटा
निघाला तर बर ।
नाहीतर देउन जखम
सलतो अंगभर । 
Sanjay R.