Monday, July 22, 2024

विरह

तोही एकटा बिचारा
सतत शोधतो सितारा ।

गवसेना त्यासी किनारा
लोटतो वादळी वारा ।

सोबतीला अश्रुंच्या धारा
सोसतो नशिबाचा मारा ।

भावनांचा खेळ सारा
अंतरात झाला पसारा ।

मिळेना कुठेच इशारा
विरह त्यालाच विचारा ।
Sanjay R.


Thursday, July 18, 2024

थेंबे थबे भरतो सागर

थेंबे ठबे भरतो सागर

शोधू कुठे मी, मिळेना घागर ।
अफाट किती ही इथली गर्दी
अहोरात्र का होतो जागर ।
सुख दुःखाच्या वाटा इथल्या
क्षणात सरते, फिरतो नागर ।
कोण मी कुठला सांगा
प्रभू तुझा रे मीही चाकर ।
Sanjay R.



Tuesday, July 16, 2024

पंढरीचा वारकरी

पाई पाई करतो वारी
पंढरीचा तो वारकरी ।

अवघा आनंद मनी
पोचायचे त्याचे दारी ।

भाव भक्तीचा ठाई
चाले सोडून दिशा चारी ।

पुढे दिसे वाट पंढरीची
तहान भूक हरली सारी ।

प्राण ही हा तळमळला
वाट पाहतो हरी हरी ।

अंतरात वसतो पांडुरंग
बोला जय जय श्री हरी ।
Sanjay R.


Sunday, July 14, 2024

काय मी करू

काय मी करू,
मनात आहे करायचे खूप
पण वेळच नाही मिळत ।
सगळे राही जागच्या जागी
मन मनाशीही नाही जुळत ।
Sanjay R.

Saturday, July 13, 2024

नको नको तू म्हणू

नको नको तू म्हणू
होऊ दे मनासारखे ।

विरहा विना उरले काय
सारेच इथे तुझ्यासारखे ।

सगळ्यांना नाही मिळत
कुणी इथे प्रेमाला पारखे  ।

कुणास मिळते सारे पण
तेही विसरतात सारखे ।

मिळालेले जपावे थोडे
थोडे वेगळे, नसेल सारखे ।

आनंद असतो त्यातही
व्हावे आपणही तशा सारखे ।
Sanjay R.