Tuesday, July 2, 2024

साथ

मन तुझे हरपले
मी हरवलो त्यात ।
माझा मी न उरलो
देशील का साथ ।
Sanjay R.

Monday, July 1, 2024

तुझी माझी कथा

तुझी आणि माझी
एकच आहे कथा ।
जिवनभराची साथ
आयुष्याची गाथा ।

डोळ्यातले अश्रू
अंतरातली व्यथा ।
हवे असो वा नको
पण सांभाळली प्रथा ।

कष्ट तुझेही त्यात
लढलो मीही स्वतः ।
गोड झाला संसार
हवेच काय आता ।
Sanjay R.


Saturday, June 29, 2024

कविता प्रकाशित

माझे व्यासपीठ या मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या जुलै 2024 च्या मासिक अंकात माझी " वेड पावसाचे "  ही कविता प्रकाशित झाली.
संपादकांचे मनापासून आभार.

गावाकडची जत्रा

गावात होती ती वेगळीच मजा
वर्षातून एकदा भरायची जत्रा ।
छोट्या पासून मोठ्या पर्यंत सारेच
हौशीने जायचे काम सोडून सतरा ।
खूप मजा तिथे आनंद ही भरपूर
म्हणायचो मी चल ना जाऊ मित्रा ।
खाणे पिणे सर्कस सिनेमा पण
तमाशाच्या तंबूत होता मात्र खत्रा ।
पैश्यावर पैसा उधळायचे पाटील
रिकामा खिसा करून संपायची जत्रा ।
Sanjay R.


Friday, June 28, 2024

पहाट

बघू किती मी वाट
रात्र सरली होईल पहाट ।
चांदण्याही सोबतीला
काय तो रात्रीचा थाट ।
तुझीच होती काय ती कमी
सोडू नको तू अशीच गाठ ।
आपला वाटतो हा एक काठ
येऊ देना सागरातही लाट ।
Sanjay R.