Tuesday, June 18, 2024

भाव भक्ती

भाव भक्तीचा मार्ग
नेईल तिथेच स्वर्ग ।
मिटून दोन डोळे
चरणी लीन होतो ।

रूप तुझे आठवतो
मनी मी साठवतो ।
न उरते आशा मग
धन्य मनात होतो ।

राग लोभ मत्सर
सारेच ते दुराचार ।
लोप होतो तयाचा
भार सारा सरतो ।

दीन दुःखी गरीब
सारे माझ्या करीब ।
मीही दास प्रभूचा
भाव भक्तीत पाहतो
Sanjay R.


प्रीत

प्रीत कुठे खरी खोटी
ती अंतरातली वेदना ।
जन्मोजन्मी असेल ती
तुझी नि माझी साधना ।
Sanjay R.

Monday, June 17, 2024

स्वप्नांना हवेत पंख

स्वप्नांना तूझ्या
हवेत दोन पंख ।
विहरशिल गगनात
ढग तिथे असंख्य ।

सूर्य असेल कुठेतरी
ढगांच्याच आड ।
चंद्रही असेल पण
तो निजलेला गाढ ।

अंगणात दिसतील
चांदण्या पसरलेल्या ।
सूर्याच्या प्रकाशात
धूसर त्या झालेल्या ।
Sanjay R.

अपेक्षा

अपेक्षांचं ओझं पाठी
पाठ गेली ही झुकून ।
चालायचे म्हणून चालतो
श्वासही गेलेत थकून ।

तुझा तो अधिकार
मला वाटतो आधार ।
दे सोडून सारेच आता
ठेवू नकोस तू भार ।

प्रेमात तुझ्या मी ही
खाल्ल्या किती खस्ता ।
दोष तो तुझा नाहीच
पण दाखवलास रस्ता ।
Sanjay R.


वेदना

मनाची ती वेदना
कळते या मनाला ।
ओठ हे मुक जरी 
अश्रू येती नेत्राला ।
Sanjay R.