Monday, June 3, 2024

तरुण भारत ला कविता प्रकाशित

आज दिनांक 2 जुन 2024 ला दैनिक तरुण भारत, आसमंत पुरवणीत माझी " बंद दार " ही कविता प्रकाशित झाली, संपादकांचे खूप खूप आभार .

Sunday, June 2, 2024

रात्र अंधारी

मनात नको दुःख
हवी थोडीशी आशा ।
बघ डोळ्यात माझ्या
सरेल साऱ्या निराशा ।

असू दे रात्र अंधारी
चांदण्या आहे सोबतीला ।
पौर्णिमेला चंद्र पूर्ण
नी काजवे अमावस्येला ।
Sanjay R.


चांदण्यांचा बहर

आकाश काळे चमचमते
चांदण्यांचा बहर आला ।
मधेच डोकावतो चंद्र
सारतो दूर तो निषेला ।
Sanjay R.


Saturday, June 1, 2024

प्रेमाची माळ

जपतो मी मनात
 प्रीय प्रेमाची माळ ।
अवघा आनंद मनी
रुणझुण वाजे चाळ।
Sanjay R.

माहेरचे अंगण

याद येते महेराची
लेक तू लाडाची ।
विसरू नको कधी तू
माया त्या आईची ।

बाप असेल कठोर
त्याच्याहून कोण थोर ।
मनात तुझा विचार
लाडाची तू ग पोर ।

रोज येते आठवण
तुझ्या भोवती मन ।
नको नको वाटतो
तुझ्या विना एक क्षण ।

सूने सुने झाले घर
झाले ओसाड आंगण ।
सूर कानात घुमतात
वाजे रुणझुण पैजण ।

लेक येता माहेराला
झुलते तुळस अंगणात ।
मोगरा ही बहरतो
दरवळ ही या मनात ।
Sanjay R.