Saturday, June 1, 2024

माहेरचे अंगण

याद येते महेराची
लेक तू लाडाची ।
विसरू नको कधी तू
माया त्या आईची ।

बाप असेल कठोर
त्याच्याहून कोण थोर ।
मनात तुझा विचार
लाडाची तू ग पोर ।

रोज येते आठवण
तुझ्या भोवती मन ।
नको नको वाटतो
तुझ्या विना एक क्षण ।

सूने सुने झाले घर
झाले ओसाड आंगण ।
सूर कानात घुमतात
वाजे रुणझुण पैजण ।

लेक येता माहेराला
झुलते तुळस अंगणात ।
मोगरा ही बहरतो
दरवळ ही या मनात ।
Sanjay R.


Friday, May 31, 2024

लाल टिक्का

असू दे रंग कसाही
नाही गुलाबाचे वेड ।
मोगरा फुलतो मनात
काढावी तुझी छेड ।

नाही मनात माझ्या
गोऱ्या काळयाचा भेद ।
अंतरंग हवे सुंदर
नको बाकी अनुच्छेद ।

रंग गडद असा जो
नेहमीच पडतो फिक्का ।
शोभून दिसतो एक
कपाळी तो लाल टिक्का ।
Sanjay R.


रंग गुलाबी

गाल गुलाबी
ओठावर लाली ।
डोळ्यात काजळ
कुमकुम भाली ।
केसात गजरा
ठुमकत ती आली ।
रंभा म्हणूकी उर्वशी
भेट परीशी झाली ।
बघत राहिलो मी
नजर तिची खाली ।
ओशाळले मन
तीच हसली गाली ।
Sanjay R.


Thursday, May 30, 2024

बाप माय

कशास रे तू करतो दुःख
क्षण सुखाचे जातील वाया ।

आई बापा विना इथे रे
करतोच कोण इतकी माया ।

माय माऊली ती मायेची
बाप घराची बनतो छाया ।

माय होते जेव्हा आधार
होतो बाप कुटुंबाचा पाया ।
Sanjay R.


अंत

होतात मलाही भास
मनात आहे ध्यास ।

नसते काहीच खास
करतो मीही प्रयास ।

सोसून धरतो त्रास
असतो हवा एक घास ।

अस्वस्थ करतो वास
धरतो सत्याची कास ।

आहे कठीण हा प्रवास
सरतात शेवटी श्वास ।
Sanjay R.