राहिले दूर आता
होते जिथे ते गाव ।
वेळच नाही आता
घेऊ कुठे मी धाव ।
शहराचा रंगच न्यारा
चढलेले इथे भाव ।
नका बघू मनात
तिथे तर घावच घाव ।
ओळखतो कोण इथे
सांगितले कितीही नाव ।
शिकलो मीही आता
सगळेच इथले डाव ।
Sanjay R.
कशाला मी ठेवू
कशाची इथे आशा ।
आधीच ओढल्यास
बंधनाच्या तू रेषा ।
गोड असो वा कडू
इथे एकच भाषा ।
निष्पन्न तोच त्यातून
उरते फक्त निराशा ।
जावे कुठे कळेना
समोर तर दश दिशा ।
लोटातील हेही दिवस
गुंडाळणार नाही गाशा ।
Sanjay R.
नजर तुझी अशी की
वाट मी पाहतो सारखी ।
कधी येते नी कधी जाते
मनात एक आस सारखी ।
लागेना डोळ्यास डोळा
येते याद तुझीच सारखी ।
असे क्षणाचीच ती भेट
हवी नजरानजर सारखी ।
का गुंतले मन हे तुझ्यात
असावी तू पुढ्यात सारखी ।
अबोल असू दे तुझी वाचा
नजरेचा आहे मी पारखी ।
Sanjay R.