Wednesday, April 26, 2023

दरवळला सुगंध दूर

माळला तू केसात गजरा
दरवळला  सुगंध दूर ।
लागली चाहूल मोगाऱ्याची
आणि मन झाले आतुर ।

शोधू कुठे कसे तुजला
नेत्र माझे नाहीत चतुर ।
वारा हळूच सांगून गेला
मधुर किती तुझा ग सुर ।

आठवण आहे अजून ती
मन त्यातच असते चुर ।
सांगतो मी गुपित मनातले
भासते तूच मझी ग हूर ।
Sanjay R.


जगण्याची रीती

का असे तू छळतेस
सोड ना तुझी उदासी ।
हसून दे तू जरासे
जग सारे हे आभासी ।

दुःख मनातले सारे
मनातच तू असू दे ।
गालावर थोडे स्मित
तेच जगाला दिसू दे ।

आहेच कोण इथे सुखी
अंतरात सारेच दुःखी ।
हुंदका दाबून बोलतात
सांग यात काय चुकी ।

डोळ्यात असतील जरी
आसवांचे थेंब किती ।
गालावर कुठे ओघळतात
हीच जगण्याची रीती ।
Sanjay R.


मन का उदास

कळेना मज काही
हे मन का उदास ।
वाटे भीती कशाची
पडे डोक्यावर घन ।
भार हटेना कशाचा
कठीण एकेक क्षण ।
सुन्न पडली काया
प्राण सुटेना पण ।
Sanjay R.


कशास मी उदास

हसण्यास नको कारण
हीच जगण्याची मजा आहे ।
होऊ कशास मी उदास
जगतो म्हणून श्वास आहे ।
बघतो ते जीवन मी
जगणे ऐक ध्यास आहे ।
कुणास ठाऊक जीवनाचे
जीवन हे आभास आहे ।
Sanjay R.


बसेल मानगुटीवर भूत

श्रद्धेपाई होऊ नका अंध
बसेल मानगुटीवर भूत ।
पारखून निरखून बघा
आणि मगच जोडा सुत ।
Sanjay R.