Tuesday, April 25, 2023

अंध श्रद्धा

असू दे श्रद्धा तुझी
नको अंधश्रद्धा ।
अविचारी ते सारे
डाव नाही साधा ।
देतील घाव दुःखाचे
आहे ही दुविधा ।
Sanjay R.


कळले अर्थ सारे

शब्दातून तुझ्या मज
कळले अर्थ सारे ।
अंतरात माझ्या होते
सरले तेही पहारे ।

नेत्रांना आता आस
थकले करून इशारे ।
बसले नजर ते लावून
जणू गगणातले तारे ।

आसव सुकून गेले
कसे हिरमुसले बिचारे ।
शब्दांनी दिला सहारा
बोलले ओठ हसारे ।
Sanjay R.


प्रीत तुझी माझी

रंग प्रीतीचा मज
बघून तूला चढला ।
विचारात आता तूच
छंद तुझाच जडला ।

डोळ्यात चढली धुंदी
श्वास तुझ्यात अडला ।
आभास होतात तुझेच
बदल कसा हा घडला ।

शोधू तुला कुठे मी
जीव तुझ्यात दडला ।
घे हात तू हातात
हृदयास घाव पडला ।

प्रीत ही तुझी माझी
मोगराही दरवळला ।
गंधात भान हरपले
संथ वारा सळसळला ।
Sanjay R.


शोधू कुठे मी आनंद

हवा मज आनंद
सांगा कुठे शोधावा ।
पैश्यात दिसतो कधी
मग करतो मी धावा ।

पैसा पैसा करतो
पैसा वाटतो हवा ।
दुःखातून परतता
मार्ग शोधतो नवा ।

परत वाढते हाव
उरते फक्त ती धाव ।
मग मृत्यू संगे सरते
सांगा उरते कुठे नाव ।

पैश्या विना इथेहो
होते कुठे ते काय ।
विसरतो नाते सारे
कोण बाप कोण माय ।

नको नको तो पैसा
आनंद हवा वाटतो ।
दुःखात आहे सुख
दुःखच मीही मागतो ।
Sanjay R.


नको धरू आस

नको धरू आस
इथे सारेच आभास ।

म्हणू कुणास खास
करते कराविते दास ।

नाही कशाचा ध्यास
नाही उरला विश्वास ।

आवळतो कसा फास
फक्त सोसायचा त्रास ।

जगतो आहे म्हणून
चालतात हे श्वास ।
Sanjay R.