Tuesday, April 25, 2023

नको धरू आस

नको धरू आस
इथे सारेच आभास ।

म्हणू कुणास खास
करते कराविते दास ।

नाही कशाचा ध्यास
नाही उरला विश्वास ।

आवळतो कसा फास
फक्त सोसायचा त्रास ।

जगतो आहे म्हणून
चालतात हे श्वास ।
Sanjay R.


कशाचा वंश कशाचा दिवा

चला करू या
निषेध आता ।
कशाचा वंश
कशाचा दिवा ।

मिणमिणती ती
पणती बरी ।
फंडा हाच
जीवनात हवा ।

कोणी कुणाचा
नाही इथे ।
करतो कोण
तुमची सेवा ।

आयत्या बिळात
नागोबा हो ।
सगळ्यांनाच हवा
फक्त मेवा ।
Sanjay R.


निषेध

सत्कार्याचा नको निषेध
दुर्यचाऱ्यांचा करू भेद ।
सतगुणी हवेत सारे
चला घेऊ त्यांचा वेध ।
Sanjay R.


वंश

वंशाचा ऐक दिवा
चालवी परंपरेचा ठेवा ।
ओळख तीच पुरेशी
सांभाळ तूच देवा ।
Sanjay R.


रात राणी

काळया निळ्या रात्री
कळी एक फुलली ।
दरवळला सुगंध त्यात
रातराणी ही भुलली ।
Sanjay R.