Sunday, April 23, 2023

जगण्यात मजा आहे

जगण्यात आहे मजा
जगणारा फक्त हवा ।
रोज असतो दिवस वेगळा
मनात विचार नवा ।
निसर्गाने दिला आम्हास
विपुल इथला ठेवा ।
द्यायचे वाईट सारे सोडून
घ्यायचा हवा तो मेवा ।
Sanjay R.


आई बाबा तुमचे स्वप्न

आई माझ्या स्वप्नांना
दिला तूच तर आकार ।
तुझ्याच ग कष्टांनी
केले मी ते साकार ।

विसरेल कसा बाबांना
होता त्यांचाच आधार ।
शिकविला मलाही त्यांनी
दृढ येक निर्धार ।

बघतली मेहनत तुमची
कष्ट तेही मी शिकलो ।
तुमच्या विना मी कुठला
म्हणू नका तुम्ही थकलो ।

तुम्ही वृक्ष मी काठी
जन्म माझा तुमच्या साठी ।
नका जाऊ खचून असे हो
हवेत मजला तुम्ही पाठी ।
Sanjay R.


बहरला गुलाब मोगरा

बहरला गुलाब
मोगरा दिसेना ।
दरवळला सुगंध
काहीच सुचेना ।

गुलाबी तो गुलाब
डोलतो थाटात ।
शुभ्र वस्त्रात मोगरा
हसतो गालात ।

पानातून डोकावून
हळूच बघते कळी ।
धुंद वाऱ्यावर कशी
झुलते पाकळी ।
Sanjay R.

आधार

मनात एकच विचार
डोकावतो वारंवार ।
नाही त्याला सार
नाही कुठला आधार ।

कळेना काय प्रकार
होतो डोक्याला भार ।
हवा असतो होकार
पण मिळतो नकार ।

मन होते तार तार
अंतरात जणू प्रहार ।
निराशेची ती खाई
शब्द पडेना चकार ।

कशी ही व्यथा
कसा हा संसार ।
परत वाटते मग
हवाच एक आधार ।
Sanjay R.


स्वप्न आई बाबाचे

लहानाचे मोठे करण्या
सोसले कष्ट किती ।
आई बाबांच्या डोळ्यात
बाळाचे स्वप्न किती ।

बाळ झाले मोठे
वाटते आता भीती ।
पासारूनिया पंख ते
जाईल दूर किती ।

म्हातारे होतील येकटे
उरेल काय हाती ।
विचारानेच त्यांची
धडधडते कशी छाती ।
Sanjay R.