Sunday, April 23, 2023
बहरला गुलाब मोगरा
आधार
मनात एकच विचार
डोकावतो वारंवार ।
नाही त्याला सार
नाही कुठला आधार ।
कळेना काय प्रकार
होतो डोक्याला भार ।
हवा असतो होकार
पण मिळतो नकार ।
मन होते तार तार
अंतरात जणू प्रहार ।
निराशेची ती खाई
शब्द पडेना चकार ।
कशी ही व्यथा
कसा हा संसार ।
परत वाटते मग
हवाच एक आधार ।
Sanjay R.
स्वप्न आई बाबाचे
हा आभास
लालसा या मनात
बघावे मन भरून ।
बोलावे इतके की
जावी रात्र सरून ।
बघावे डोळ्यात
त्यात मी दिसावा ।
शब्दात तुझ्या मी
क्षणो क्षणी असावा ।
स्वप्नांचा तुझ्याही
हवा मज आभास ।
त्यात तू आणि मी
व्हावे ऐक श्वास ।
Sanjay R.
कहर चोरीचा
रातच्यांन आले चोर
केला त्यायान कहर ।
आले चोरी कराले न
गेले पिऊन जहर ।
कपाशीवर माराले
औषिध होत ठीउन ।
काय झालं कोणास ठाव
थेच घेतल पिऊन ।
चढली असन गुंगी
रायले जागीच निजून ।
धरले लोकायन मंग
कहाडले चांगले शिजून ।
जन्मभर इसरणार नाही
लयच त्यायले झोडल ।
म्हणते नाव चोरीच हो
शपथ घेऊन सोडलं ।
Sanjay R.