शब्द जणू विखरले
भोवती कानाच्या पसरले ।
मूक शब्दांची होती गाथा
कळेना उच्चार त्यातले ।
सहज पहिला करून उलगडा
जुळले भावनेशी आतले ।
मन होते जेव्हा निराश
वाटले कोण इथे कुठले ।
गालावर थेंब दोन पाण्याचे
पण होते अश्रू ते डोळ्यातले ।
Sanjay R.
Sunday, April 23, 2023
शब्द
Wednesday, April 19, 2023
हवा संमान
प्रत्येकाला हवा असतो मान
तेच वाढविते त्याची शान ।
नका करू विचार कशाचा
कोण मोठा कोण लहान ।
नक्कीच मिळेल तुम्हास ही
द्या थोडा प्रत्येकास सम्मान ।
Sanjay R.
मैत्री
जीवनाला हवी मैत्रीची जोड
मैत्रीला नाही कशाची तोड ।
क्षणोक्षणी येते आठवण
नसेल तितकी कशात ओढ ।
आनंद असो वा दुःख असो
मित्र असेल तर नसते लोड ।
समजून घेऊन मिळते साथ
मैत्रीत सारेच होते गोड ।
Sanjay R.
माणुसकीची भिंत
जागो जागी आडवी इथे
माणुसकीची भिंत ।
कुणास नाही घेणे देणे
वाटेल कशी खंत ।
आपुलकीची भावना कुठे
विचार झाले संथ ।
सारेच इथे आहे बदलले
नाही उरलेत संत ।
ज्याचा त्याचा एकच हेका
आहेच कुठे विचार वंत ।
काय आता कुणास ठाऊक
होईल का हो अंत ।
Sanjay R.
Subscribe to:
Comments (Atom)