जागो जागी आडवी इथे
माणुसकीची भिंत ।
कुणास नाही घेणे देणे
वाटेल कशी खंत ।
आपुलकीची भावना कुठे
विचार झाले संथ ।
सारेच इथे आहे बदलले
नाही उरलेत संत ।
ज्याचा त्याचा एकच हेका
आहेच कुठे विचार वंत ।
काय आता कुणास ठाऊक
होईल का हो अंत ।
Sanjay R.
जागो जागी आडवी इथे
माणुसकीची भिंत ।
कुणास नाही घेणे देणे
वाटेल कशी खंत ।
आपुलकीची भावना कुठे
विचार झाले संथ ।
सारेच इथे आहे बदलले
नाही उरलेत संत ।
ज्याचा त्याचा एकच हेका
आहेच कुठे विचार वंत ।
काय आता कुणास ठाऊक
होईल का हो अंत ।
Sanjay R.
झाली चूक एकदा
मिळाली माफी तेव्हा ।
परत परत होते चूक
माफी आता केव्हा केव्हा ।
नकोच ती चूक परत
सारेच आले आता सरत ।
चुकीला नको माफी
जगायचे फक्त हरत ।
Sanjay R.
चुकातून निघे मार्ग
गाठतो मीही स्वर्ग ।
नको घेऊ मनास लाऊन
मदतीला ते येतील धाऊन ।
जीवनाचा मार्ग जरी कठीण
घट्ट असावी नात्याची विण ।
नको कधीच तो दुरावा
आनंदात जगण्याचा पुरावा ।
चुकले कुठे सांग माझे
स्वप्न तर एकच माझे तुझे ।
Sanjay R.