Monday, April 3, 2023

आयुष्य कुठे लहान

आयुष्य कुठे लहान
बघा करून महान ।
सगुणांची ती शान
त्यांचाच होतो मान ।

करावे तितके थोडे
करू या गुण गान ।
हवी तीच आन
नाहीतर मोकळे रान ।

स्वार्थ होतो जागा
आणि सुटते सारे भान ।
लागतो भोगावा मग
पदोपदी आपमान ।

उलटून बघा येकदा
आयुष्याचे पान ।
सुंदरतेनी भरलेले
असेल तितकेच छान ।
Sanjay R.


एक जुने पान

एक जुने पान
मळलेले चुरगळलेले ।
ऐक जुने पण
अगदी जीर्ण झालेले ।

कधी पडेल गळून
नाही भरोसा आता ।
सांगते खूप काही
अखेर जाता जाता ।

आयुष्यात येतो
ऊन पाऊस वारा ।
जुने जाऊन नवे येते
बदलतो हा पसारा ।

क्षण भंगुर हे जीवन
नाही भरोसा कशाचा ।
हसत पार पाडायचे
नियम आहे जगायचा ।
Sanjay R.


आयुष्याची पाने

जन्मापासून होते सुरू
जीवनाची नवीन वही ।
रोज भरायचे ऐक पान
कर्माचा तो आलेख पाही ।
Sanjay R.


Sunday, April 2, 2023

बस एक चहा

थकवा आला पाहा
हवा एक चहा ।
मैत्रीचा दुवा पाहा
बस एक चहा ।
पाहुणे आले घरी
त्यांना ही चहा ।
कंटाळा आला आता
फ्रेश होण्यास चहा ।
काहीच नाही करायला
चला पिऊ या चहा ।
Sanjay R.


एक कप चहा

एक कप चहा
रुपये पडतात दहा ।
पिताच मिळे उत्साह
डोकेदुखी होते स्वाहा ।

मित्र मंडळी जमती जिथे
रंगती गप्पा सोबत चहा ।
न होणारे ही काम होई
चहा ची हीच करामत महा ।
Sanjay R.