जाते कुठे ही वाट
आहे माझ्याशी गाठ ।
सोडू नको रे तू पाठ
होईल परत पहाट ।
आहे जायचे पुढे पुढे
निर्धार माझा आहे ताठ ।
Sanjay R.
Monday, April 3, 2023
जाते कुठे ही वाट
चाहूल उन्हाळ्याची
किती तापतोय सूर्य
चाहूल उन्हाळ्याची ।
गर्मीचा होईल प्रकोप
गरज आता पाण्याची ।
हवी मज सावली थोडी
हवा थोडासा गारवा ।
कंठ सुकलेला हा जसा
फुलला पळस नवा ।
Sanjay R.
नकोना जाऊ तू दूर
नकोना जाऊ तू दूर
मना लागली हूर हूर ।
तुझ्याविना या मैफलीत
लागेल कसा ग सुर ।
कान ओठ डोळे बघ
झालेत किती आतुर ।
मन माझे जणू काच
नाही तितके ते चतुर ।
निराश किती हे नेत्र
का दिसतो त्यात पुर ।
म्हणेल कोण कशास
खूप होता तिथेच धुर ।
कळणार नाही कुणास
बडवतो मी माझा ऊर ।
स्वप्नही कळेना कुठे ते
का आहे कशात चुर ।
तुझ्या विना मी सांग
राहू कसा ग मी दूर ।
नकोना जाऊ तू दूर
मना लागली हूर हूर ।
Sanjay R.
एप्रिल फूल
लय झालं बावा
मलेच देली भुल ।
म्हने घेना गुलाब
लव यू अतुल ।
म्या मनल बापू
कायले खातं झुल ।
घिऊन घेन गुलाब
नसेना मी अतुल ।
लोचाच झाला बावा
तिकुन आला प्रफुल ।
म्हने बनला कानी तू
आता एप्रिल फूल ।
Sanjay R.
नको भुतांचा संग
नको भुतांचा संग
अजब त्यांचा ढंग ।
माणूस लागे घुमायला
बुध्दी होते भंग ।
विचित्र ती वागणूक
करतात किती तंग ।
दूर दूरच राहायचे
दुरूनच बघायचे रंग ।
दचकून नका जाऊ
करू भुतांशी जंग ।
भ्रमित व्हाल तर
येतील भूत संग ।
😀
Sanjay R.