Wednesday, March 29, 2023

लोभी मन

नकोच मनात लोभ
विचारांचा होतो अंत ।
वाढतो किती हव्यास
उरते कुठे मग खंत ।

मनाचा हा विकार कसा
लोभापायी चुकते वाट ।
आपुलकिशी सरते नाते
जीवनाची तुटते गाठ ।
Sanjay R.


मन

मन मनाला कळेना
अंतरात मन जळेना ।
झेलते मन आघात
वार मनावरचे टळेना ।
Sanjay R.


मन हे असे कसे

काय सांगू तुला
मन हे असे कसे ।
बघून बघ तुला
अस्थिर होते कसे ।
मनात आहे काय
कळेना कुणा कसे ।
शब्दही मनातले
मनातच वसे ।
Sanjay R.


वेडे कसे म्हणू मनास

स्वप्न बघतो मी जेव्हा
होतो तुझाच आभास ।
येताच समोर चेहरा
क्षणभर थांबतात श्वास ।
आठवण जाईना दूर
लागतो एकच ध्यास ।
नजर शोधते नजरेला
वेडे म्हणू कसे मी मनास ।
Sanjay R.


नाही तिथे प्रकाश

वाट ती अज्ञानाची
नाही तिथे प्रकाश ।
गर्द काळा काळोख
माणुसकीचा विनाश ।
ज्ञान हेच विज्ञान
तोडी जुने सारे पाश ।
उजळून निघेल मग
भासेल सुंदर आकाश ।
Sanjay R.