Monday, March 13, 2023

लग्नानंतरचे प्रेम

नसेल होत व्यक्त
म्हणून
प्रेम कुठे होते कमी ।

प्रपंचाच्या या व्यापात
मात्र
प्रेमाची असतेच हमी ।

लग्नापूर्वी वेळ जाईना
पण
नंतर मात्र वेळ कमी ।
Sanjay R.


शिव शंभू

शिव शंभू तू
सांब सदाशिव ।
थरथर कापे
सारे दानव ।

ठायी तुझ्या रे
अमुचा भाव ।
तुझ्याविना रे
नाही ठाव ।

पिंडी वरती
ठेऊन माता ।
चरणी तुझ्याच
आमुची धाव ।

तू भोळा
तूच निळा ।
महादेव तू
आम्हा पाव ।
Sanjay R.


देवाचा तू देव शंकर

हे जटाधारी महादेव
तिंहीलोकीच्या नाथा
सर्प नंदी आणि त्रिशूळ
त्यात आहे तुझी गाथा ।

करिसी त्रिलोकी तू भ्रमण
श्रीगणेशाचा तू पिता ।
वास्तव्य तुझे कैलासावरी
वसते तिथेच पार्वती माता ।

देवांचा तू देव शंकरा
नमन करितो मी आता ।
निळकंठ तू भस्मधारी
ठेवितो पिंडीवरती माथा ।
Sanjay R.


मिठी

जशी कृष्णा ने
सुदामाला दिली
प्रेमाची एक मिठी ।
मैत्री किती ती दृढ
जगायचे मरायचे
फक्त मैत्री साठी ।
Sanjay R.


गुलाब

फुलतो मोगरा
दरवळतो गंध ।
बघून गुलाब
मन होते धुंद ।
Sanjay R.