प्रवास जीवनाचा कठीण
अनोळखी इथल्या दिशा ।
भविष्याचा वेध घेण्यास
बघतो हातावरच्या मी रेषा ।
नशिबाचा फेराच उलटा
कळेना मज कुठली दिशा ।
कष्टाचा उपसून डोंगर
मिटल्या साऱ्याच रेषा ।
Sanjay R.
Monday, March 13, 2023
अनोळखी इथल्या दिशा
शाळा
मुलांची असते शाळा
सगळे होतात गोळा ।
अभ्यास खेळ दंगा मस्ती
सोबत नियम ही पाळा ।
पाठीवर पुस्तकांचा भार
लहान वयात किती प्रहार ।
होम वर्क चे असते टेन्शन
आईचा थोडासा आधार ।
बालपण नेले हिरावून
नंबर चाच असतो ध्यास ।
नको वाटते मग शाळा
द्यावा सोडून अभ्यास ।
Sanjay R.
आनंद
जुळला प्रितीचा बंध
जिकडे तिकडे सुगंध ।
सुटला वारा अंतरात
मन ही झाले बेधुंद ।
सांगू कुणा मी कसा
माझा मीच आनंद ।
चमचमतो दूर तारा
गालावर हास्य मंद ।
Sanjay R.
ऊन सावलीचा मेळा
आज निळ्या आभाळात
दूर दिसे मेघ काळा ।
सूर्य झाला आडोशाला
ऊन सावलीचा मेळा ।
थेंब चार बरसले
झाड त्याने शहारले ।
माती झाली थोडी ओली
तिचे रूप बहरले ।
पान सुकलेले ओले
फुल हळूहळू डोले ।
दूर पाखरुही बोले
सारे आनंदित झाले ।
Sanjay R.
लागेना मन कशात
लागेना मन कशात
कळेना काय मनात ।
सारख्या शोधतो वाटा
कळेना बोचातो काटा ।
उठे लाटा अंतरात
आस आहे या डोळ्यात ।
थेंब आसवांचे गाली
दुःखाचा कोण वाली ।
गेली अशीच रात
हाती माझाच हात ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)