Monday, March 13, 2023

जावई नाही हो बरा

जावई नाही हो बरा
हवा होता गोरा ।
चमकतो कसा किती
काळा कोळसा निरा ।

दिवसभर असतो खात
किती जाड त्याचा घेरा ।
ऐकतच नाही बिलकुल
म्हटल बारीक हो जरा ।

डोक्यावर टक्कल आणि
त्याचा भिंगाचा चष्मा ।
मला तर वाटते बापा
तो निसर्गाचाच करिश्मा ।

कसाही असला तरी तो
बोलायला मोठा गोड ।
म्हणतो कसा मला पाहा
किती झालो मी रोड ।
Sanjay R.


Sunday, March 12, 2023

आदेश

ओलांडायची मधली रेश
कुणास कुणाचा आदेश ।
कळेना कुणास काही
सोसायचे फक्त क्लेश  ।
नको विचार कशाचा
कोण करेल काय पेश ।
कळले मजला आता
जैसा देश वैसा भेश ....
Sanjay R.


कर्ज झाले हो भारी

कर्ज झाले हो भारी
जप्तीवाले आले दारी ।
घर सामान गेले घेऊन
सांगा आता कोण तारी ।

पोटात पेटते आग जेव्हा
हवी असते ऐक भाकरी ।
नशिबाचा खेळ सारा
देतो कोण इथे चाकरी ।

मोडक्या भिंती वर पाय
गरिबाला कोण विचारी ।
मार्ग जिथे संपले सारे
उरली ऐक अनंताची वारी ।
Sanjay R.


Saturday, March 11, 2023

अभिव्यक्ती

घटनेने दिले अधिकार आम्हा
आहे विचारांची अभिव्यक्ती ।
मिळून सारेच वसतो इथे
तीच तर आहे आमची शक्ती ।

दुसऱ्यास देतो कधी त्रास
वाटे तो आधिकार आमचा ।
नका छळू हो इथे कुणास
अधिकार आहे तोही त्याचा ।

व्यक्ती तितक्या इथे प्रवृत्त्ती
मोह मायेने केला विनाश ।
जगणे मरणे त्याच्या हाती
हसवण्याचा हवा थोडा प्रयास ।
Sanjay R.


अधिकाराची नको भाषा

कपटी तुझे रे विचार
बेलगाम तुझे वागणे ।
अधिकाराची नको भाषा
सुधार थोडे जगणे ।

जगा आणि जगू द्या
मंत्र हाच जीवनाचा ।
हेवा दावा मत्सर व्यर्थ
माणुस हवा गुणाचा ।
Sanjay R.