Monday, March 13, 2023

चुकता पाऊल

चुकता पाऊल
मार्ग नेयी पुढे ।
परतीची वाट
सापडेना कुठे ।

संकटाशी हात
अपयशाचे पाढे ।
तावून निखारून
अनुभवाचे गाडे ।

धरा सरळ वाट
सोपी जीवनाचे धडे ।
सुख आनंद लाभे
यात्रा तिर्थाची घडे ।
Sanjay R.


जमत नाही

असेल तू तर
तुझे माझे जमत नाही ।
पण तुझ्या विना तर
मज करमत ही नाही ।

जीवनाचे ही आहे असेच
हवे ते जे जवळ नाही ।
जे जे आहे जवळ
त्याची मात्र किंमत नाही ।
Sanjay R.


बंध

जुळेना बंध प्रितीचा
मनाचे मनालाच कळेना ।
नकोच विचार कुठले
विचार विचारांशी जुळेना ।
Sanjay R.


पहिली भेट

बघतो तुज क्षणोक्षणी
तुजसारखे नाही कोणी ।
हसणे तुझे बघणे तुझे
वेड लागले माझ्या मनी ।

आठवते ती पहिली भेट
शब्द सूचेना बंद ओठ ।
बघत राहिलो चेहरा तुझा
सांगून गेले डोळेच गोष्ट ।
Sanjay R.


दंडाचा भेव

साम न्हाई दाम न्हाई
दंडाचा हाये मोठा भेव ।
बसते लहान तोंड कुन
पर आनला बावा चेव ।
Sanjay R.