Saturday, March 11, 2023
अधिकाराची नको भाषा
थोडी दारू थोडे पाणी
हवे कुणास काय बघा
थोडी दारू थोडे पाणी ।
दुःख झाले जेव्हा भारी
थोडी दारू थोडे पाणी ।
झाला आनंद मोठा तरी
थोडी दारू थोडे पाणी ।
वेळ जात नाही मग काय
थोडी दारू थोडे पाणी ।
मन लागत नाही कशात
थोडी दारू थोडे पाणी ।
मित्र आले भेटायला तर
थोडी दारू थोडे पाणी ।
मित्र नाही आले आज
थोडी दारू थोडे पाणी ।
काहीच नाही करायला
थोडी दारू थोडे पाणी ।
पैसा संपला द्या ना कोणी
थोडी दारू थोडे पाणी ।
नको वाटते जगणे आता
थोडी दारू थोडे पाणी ।
मरण जरी रुसले तरी
थोडी दारू थोडे पाणी ।
दारू सरली नाही पाणी
पाजा ना हो आहे कोणी ।
नको कोण म्हणतोय इथे
हवीच दारू थोडे पाणी ।
परिवार गेला सारे संपले
दारू दारू आणि पाणी ।
जगता जगता मेला कसा
होती दारू थोडे पाणी ।
दारू दारू फक्त दारू
सुधारला का सांगा कोणी ।
Sanjay R.
आहे कुणी मनात
येते मज आठवण
आहे कुणी मनात ।
नकळे मज काही
काय तिच्या मनात ।
बघतो मी जेव्हा
सदा असते हसत ।
बघताच आले नाही
असते केव्हा रुसत ।
नजरेला मिळता नजर
असते चमक डोळ्यात ।
बोलतात डोळे काही
ती सांगेल का शब्दात ।
डोळे माझेही वाटेवर
ते सारेच जाणतात ।
ओठांना संदेश माझा
ऐकायचे काय बोलतात ।
Sanjay R.
रंग पंचमी धमाका
रंग मिठाई आणि उत्साह
तालावर नाचायचे लावून गाणी ।
त्यासाठी थोडी एनर्जी हवी
शोधतात मग रंगीत पाणी ।
अडखळतात पाय आणि
मग होतात अनवाणी ।
पत्ताच नसतो कशाचा
शौकिनांची हीच कहाणी ।
Sanjay R.
जाऊ नको दूर
जाऊ नको दूर
मनात हुर हूर ।
थांबेना उचकी
जातास तू दूर ।
मिटेना डोळे मग
येतो त्यात पूर ।
दाटतो गळा माझा
लागेना मग सुर ।
स्वप्नही पडेना
तेही किती चतुर ।
परतून ये सखे
मन झाले आतुर ।
Sanjay R.