Sunday, March 5, 2023

भावना

भावनांना नाही गंध
क्षा होणार धुंद ।
मन सदा असते दुःखी
जुनाच आहे तो छंद ।
हसावे वाटते मलाही
शोधतो मग मी आनंद ।
नकळत होतो उदास
खुलेना अंतरातला बंध ।
घेतो मिटून डोळे
वाटते मी असाच अंध ।
Sanjay R.


Friday, March 3, 2023

हवा कुणास आधार


हवा कुणास आधार
डोक्यावर होतो भार ।
पदोपदी मी झेलतो
मनात सारे प्रहार ।

असह्यच होते सारे
देतात घाव ते वार ।
थांबतात कुठे डोळे
आपोआप लागे धार ।

मुक्त व्हायचे मजला
नको वाटती विचार ।
भूत झालेत ते जुने
नवा शोधतो मी सार ।
Sanjay R.



शोधू मी कुठे तुला

शोधू मी कुठे तुला
तूच तर माझी आस ।
नजरही असते शोधत
नजरेलाच होतात भास ।

गंध तुझा दरवळतो
धुंद होतात श्वास ।
मनही मग घेते धाव
त्यालाही तुझाच ध्यास ।

तू मात्र सदा बेखबर
कळेना तुज माझे प्रयास ।
बघ जरा वळून मागे
अजूनही माझा तिथेच वास ।
Sanjay R


Thursday, March 2, 2023

आहे देव या मनात

जिथे भाव तिथे देव
मनातली आहे ठेव ।

संकटात येता याद
विश्वासास मिळे साद ।

करायची थोडी भक्ती
जाणायची त्याची शक्ती ।

नाही कशाचीच आशा
करी दूर तो निराशा ।

करू देवाचाच ध्यास ।
निरंतर घेऊ श्वास ।

आहे देव या मनात
शोधा त्यासी माणसात ।
Sanjay R.


नको ते विचार

नको ते विचार
डोक्यात येतात ।
अस्वस्थ करून
मग दूर जातात ।

सुचत नाही काही
विचारही थांबतात ।
नजर जाते शून्यात
श्वास मंद होतात ।

नको नको ते विचार
हवा थोडा आनंद ।
विसरून सारे बघा
होऊ चला धुंद ।
Sanjay R.