Thursday, March 2, 2023

आठवण

तुझ्या आणि माझ्यात
ऐक वेगळाच बंध ।
तू तिथे आणि मी इथे
तरीही दरवळतो सुगंध ।

हसतेस ना तू जेव्हा
मन माझेही हसते ।
आठवतो चेहरा तुझा
शोधतो कशी तू दिसते ।

विसरेल मी कसा
जुन्या त्या आठवणी ।
कधी व्हायची हळवी
नी डोळ्यात पाणी ।

आज सहजच मज
का याद तुझी आली ।
मीही झालो हळवा
का सोडून तू गेली ।
Sanjay R.


अतूट हे नाते

अतूट हे नाते
जसे जन्मांतरीचे ।
आई तिचा बाळ
नाते ते अनंताचे ।

पिलासाठी पाखरू
करी धावाधाव ।
आई विना पोर
झेले सारे घाव ।

नाते हे अनोखे
नाही त्यात दुरावा ।
जगात श्रेष्ठ माता
हवा कशास पुरावा ।
Sanjay R.


तूच विठू तूच शाम

स्मरणात असो नाम
तूच विठू तूच शाम ।
मनी नाहीच काही
रूप तुझेच ठाम ।
आस तुझी मनात
म्हणतो मीही राम ।
चंद्रभागा वाहे डोळी
पंढरीत आहे धाम ।
मुखी विठ्ठल विठ्ठल
तूच विठू तूच शाम ।
Sanjay R.


भावनांना नाही गंध

भावनांना नाही गंध
क्षा होणार धुंद ।
मन सदा असते दुःखी
जुनाच आहे तो छंद ।
हसावे वाटते मलाही
शोधतो मग मी आनंद ।
नकळत होतो उदास
खुलेना अंतरातला बंध ।
घेतो मिटून डोळे
वाटते आहे मीही अंध ।
Sanjay R.


धुंद या भावना

का धुंद या भावना
मज मनाचे कळेना ।
कधी होते ते उदास
स्वप्नातही तेच आभास ।
कधी लागतो ध्यास
होतात संथ श्वास ।
लागते नजर आकाशी
घेणे देणे नसे कशाशी ।
Sanjay R.