Thursday, March 2, 2023

हास्य गालावर

दुःख इथे पावलोपावली
डोळ्यात आसवांच्या धारा ।
दाखवीतो हास्य गालावर
तिथेही दुःखाचा पहारा ।
दुःखात शोधतो आनंद
जातो विसरून इशारा ।
बघतो दूर मी आकाशात
चमचमतो तिथेही तारा ।
Sanjay R.


जगणे जीवनाचे

जगतो ते जीवन
हसतो तो आनंद ।
दुःख तर पाठीशी
तरी असतो धुंद ।

नेत्रांनी बघायचे
सुख ते भोगायचे ।
हसत हसतच
जीवन जगायचे ।

आशेचा तेवे दीप
मन कधी आतुर ।
दुःखात जळे मन
मग डोळ्यात पुर ।

जगणे जीवनाचे
तोच आहे आधार ।
सरे दिवस मग
कुठे उरे विचार ।
Sanjay R.


राजाची राणी

कळेना मजला
कोण राजा कोण राणी ।
शोधूनही मिळेना
काही कशाची निशाणी ।
उरली फक्त आता
ती जुनी कहाणी ।
ऐकायलाही मिळेना
इथे बालक कोणी ।
मोबाईल मधे सारे गुंग
येते डोळ्यात पाणी ।
Sanjay R.


राजा राणी

ऐक सुंदर कहाणी
त्यात राजा राणी ।
सगळे सुखी
नाही दुःखी कोणी ।
खूप पिके धान्य
मुबलक होते पाणी ।
संपन्न तिथले लोक
सोन्याच्याच खाणी ।
फिरले ग्रह सारे
लागला मागे शनी ।
ताटातूट झाली
कुठे राजा कुठे राणी ।
पडेना आता पाऊस
डोळ्यात भरले पाणी ।
दुःख आणि दारिद्र्य
दिसे तीच निशाणी ।
Sanjay R.


Wednesday, March 1, 2023

भावनाहीन आयुष्य

उरल्याच कुठे भावना
आयुष्याचा झाला खेळ ।
मागे वळून बघणार नाही
सरली आता ती वेळ ।

आयुष्य गेले निघून
कुठे बसला कशाचा मेळ ।
क्षण आता उरलेत कमी
नको वाटतो सगळा छळ ।

अंतिम क्षणी एकच इच्छा
हे मजला थोडे बळ ।
पुसून टाकील आठवणी
मृत्यू तर आहेच अटळ ।
Sanjay R.