शब्दातून तुझ्या मी
काढू कसा तो अर्थ ।
वाटले विषारी बाण
नाही मज तो स्वार्थ ।
शब्दात दिसे भावना
भावनेत असे मन ।
शब्द झालेत फितूर
निराकार झाले तन ।
नको आता उजळनि
उजाडली परतीची वाट ।
जायचे विसरून आता
झाली मोकळी गाठ ।
Sanjay R.
नको दाखवू अभिमान
खोटी तुझी रे शान ।
फुकाचा रे हा मान
कळे साऱ्यासी छान ।
बघ होऊन तू लहान
होशील किती महान ।
न मागता मिळेल
तुज सारा मानपान ।
मिरवतील जन सारे
हरपेल तुझे भान ।
मोठा होऊनही वाटेल
सुंदर तुझेच ध्यान ।
Sanjay R.
माझ्या मराठीची गोडी
जन जनास ती जोडी ।
वऱ्हाडीची तिला साथ
सोबतीला पुणेरी हात ।
खानदेशी आहे बाज
मुंबा नगरीचा तिला साज ।
थोरा मोठ्यांनी सजविले
या महाराष्ट्रात रुजविले ।
माय मराठी मी म्हणतो
गाणे तिचेच गुणगुणतो ।
गातो मराठीची मी थोरवी
फुलते मनामनात पालवी ।
Sanjay R.
नको जाऊ तू सोडून
भरला हा संसार ।
तुझ्या विना संग मज
आहे कुणाचा रे आधार ।
जगणे मरणे नाही हाती
पण कशास तो विचार ।
मन होते असे अधर
आणि अंतरात रे प्रहार ।
साथ जीवनाची आहे
उचल थोडा तू भार ।
झेलील मीही तुझ्यासवे
होतील जेही वार ।
Sanjay R.