नको बघू काही
नजरा इथे विषारी ।
नको बोलू काही
शब्दही इथे दुधारी ।
ठाऊक कुणास चव
विषाची नको परीक्षा ।
जो तो दिसे इथे
घेऊन जहरी दीक्षा ।
आभास असतो सारा
वाटे अमृताची धारा ।
बघूनच ठेवा पाऊल
नाही कळणार इशारा ।
Sanjay R.
नको दाखवू अभिमान
खोटी तुझी रे शान ।
फुकाचा रे हा मान
कळे साऱ्यासी छान ।
बघ होऊन तू लहान
होशील किती महान ।
न मागता मिळेल
तुज सारा मानपान ।
मिरवतील जन सारे
हरपेल तुझे भान ।
मोठा होऊनही वाटेल
सुंदर तुझेच ध्यान ।
Sanjay R.
माझ्या मराठीची गोडी
जन जनास ती जोडी ।
वऱ्हाडीची तिला साथ
सोबतीला पुणेरी हात ।
खानदेशी आहे बाज
मुंबा नगरीचा तिला साज ।
थोरा मोठ्यांनी सजविले
या महाराष्ट्रात रुजविले ।
माय मराठी मी म्हणतो
गाणे तिचेच गुणगुणतो ।
गातो मराठीची मी थोरवी
फुलते मनामनात पालवी ।
Sanjay R.