Tuesday, February 14, 2023

अंगणात असावी तुळस

तुझ्यासाठी
केला मी नवस ।
मग प्रेमासाठी
फक्त ऐक दिवस ।
नको नको
सोड आता आळस ।
रोज बघतो
मंदिराचा कळस ।
गंध नसेल त्याला पण
लाल झालाय पळस ।
तरीही वाटतं
अंगणात असावी तुळस ।
Sanjay R.


Saturday, February 11, 2023

गुलाब

फुलतो मोगरा
दरवळतो गंध ।
बघून गुलाब
मन होते धुंद ।
Sanjay R.

Wednesday, February 1, 2023

महागाई

माझी महागाई वरील कविता माझे व्यासपीठ  या  फेब्रुवारी च्या मासिक अंकात प्रकाशित झाली. संपादकांचे धन्यवाद.  

Thursday, January 26, 2023

शान आमची तिरंगा

शान आमची तिरंगा
मान अमुचा तिरंगा ।
उंच झळके तिरंगा
मनात सन्मान तिरंगा ।
आमचा जोश तिरंगा
जयघोष अमुचा तिरंगा ।
भारत आमचा तिरंगा
आम्ही भारतीय तिरंगा ।
Sanjay R.