Wednesday, January 18, 2023

धीर

इकडे आड
तिकडे विहीर
आयुष्याच्या पलीकडे
लागली बघा
नजर भिरभिर
सांग थांबू कसे मी
नाही उरला
आता धीर ....


दुःखावरती करू प्रहार

आयुष्यात एकच विचार
सुख समृद्धीची हवी बहार ।
डोक्यावरती नकोच भार
दुःखावरती करू प्रहार ।

जीवनाचा एकच आधार
क्षण दुःखाचे होतील सार ।
अपयशाला विसरून जाता
दूर होईल प्रत्येक हार ।
Sanjay R.


आयुष्याच्या पलीकडे

आयुष्याच्या पलीकडे
उंच ऐक उभी भिंत ।
दिसेना कुठेच काही
कशास हवी मग चिंता ।

रोज पूर्वेस उगवतो सूर्य
मावळतो ती पश्चिम ।
दिवसभर चालतो गाडा
मग श्वासही होतात क्षीण ।

उठतो तो दिवस माझा
परत असतो तोच परिपाठ ।
सुटणार नाही कधीच
जीवनात ही बांधलेली गाठ ।
Sanjay R.


सौंदर्याला नकोच आरसा

सौंदर्याला नकोच आरसा
मटकण्याचा विचार फारसा ।
तितकेच हवे मनही सुंदर
शोभून उठतो तोच वारसा ।

सौंदर्याचा नको अभिमान
चंद्रावरही आहेत डाग ।
विचारांचा होतो सन्मान
चांदणीलाही कुठे राग ।
Sanjay R.


निसर्गाची लीला न्यारी

अथांग इथला सागर
काठ त्यास धरतीचा ।
निसर्गाने ओढली चादर
शृंगार बघा या धरेचा ।

जिकडे तिकडे वृक्ष वेली
हिरवा कंच तिचा पदर ।
फुलांची जेव्हा होते उधळण
रंगात कुठे हरवते नजर ।

नदी वाहते घेऊन पाणी
झुळझुळ नाद गाते गाणी ।
रात्री जेव्हा होतो काळोख
चंद्र बघिनी हसते चांदणी ।

निसर्गाची लीलाच न्यारी
विश्वाची ही रचना प्यारी ।
सौंदर्याची नाहीच तुलना
बघून सारे वाटे भारी ।
Sanjay R.