Wednesday, January 18, 2023

निसर्गाची लीला न्यारी

अथांग इथला सागर
काठ त्यास धरतीचा ।
निसर्गाने ओढली चादर
शृंगार बघा या धरेचा ।

जिकडे तिकडे वृक्ष वेली
हिरवा कंच तिचा पदर ।
फुलांची जेव्हा होते उधळण
रंगात कुठे हरवते नजर ।

नदी वाहते घेऊन पाणी
झुळझुळ नाद गाते गाणी ।
रात्री जेव्हा होतो काळोख
चंद्र बघिनी हसते चांदणी ।

निसर्गाची लीलाच न्यारी
विश्वाची ही रचना प्यारी ।
सौंदर्याची नाहीच तुलना
बघून सारे वाटे भारी ।
Sanjay R.


हृदयात हवी जागा

आयुष्याचे कोरे पान
शब्दांनी घेतली जागा ।
प्रेम क्रोध दोन्ही तिथे
क्रोधाने दिला दगा ।
जिंकले हो प्रेम परत
हसून थोडे तुम्ही बघा ।
प्रेम सहज फुलते
हृदयात हवी जागा ।
Sanjay R.


कोरे पान

आयुष्य माझे कोरे पान
होतच नाही कसेच छान ।
हवा असेल जर मान पान
पैसा फक्त हवा नको ज्ञान ।
फुकटचा आणून आव
मारायची इथे कोरडी शान ।
हिंडा फिरा रानो रान
नाही इथे कशाची वान ।
Sanjay R.


Thursday, January 5, 2023

पांडुरंग पांडुरंग

मी गातो पांडुरंग
विठ्ठला तुझा अभंग ।
साथ दे जराशी
वाटे हवा तू संग ।

दगडात मी पाहिला
नाही काळा तुझा रंग ।
रूप बघून मी तुझे
झालो तुझ्यात रे दंग ।

तुझ्या मुखावर हास्य
भासतो तू श्रीरंग ।
मन जडले तुझ्यात
तू करू नको भंग ।

वाटे मलाही आता
व्हावे पांडू रंग
तुझ्या नं स्मरणात
जावे होऊन दंग ।

हरी राया तू विठ्ठला
पांडू रंग पांडू रंग ।
बघ दास तुझा मी
पांडू रंग पांडू रंग ।
Sanjay R.


नको नको हा गारवा

ढगांनी वेढले आकाश
सूर्य कुठे ते कळेना ।
गार वारा सळसळला
लाकडं ओली जळेना ।

हात लागले कापाया
बोल ओठातून पडेना ।
वाटे धरावा शेक हाती
भेट आगट्याशी घडेना ।

गरम चहाचा कप ऐक
वाटे घेऊन त्यास धरावे ।
दूर कुठे पेटती आग
तीस डोळे भरून पहावे ।

नको नको हा गारवा
वाटे सूर्यास जाऊन शोधावे ।
बसून उन्हात क्षण चार
अंग हे थोडेसे भाजावे ।
Sanjay R.