Wednesday, January 18, 2023

आयुष्याच्या पलीकडे

आयुष्याच्या पलीकडे
उंच ऐक उभी भिंत ।
दिसेना कुठेच काही
कशास हवी मग चिंता ।

रोज पूर्वेस उगवतो सूर्य
मावळतो ती पश्चिम ।
दिवसभर चालतो गाडा
मग श्वासही होतात क्षीण ।

उठतो तो दिवस माझा
परत असतो तोच परिपाठ ।
सुटणार नाही कधीच
जीवनात ही बांधलेली गाठ ।
Sanjay R.


सौंदर्याला नकोच आरसा

सौंदर्याला नकोच आरसा
मटकण्याचा विचार फारसा ।
तितकेच हवे मनही सुंदर
शोभून उठतो तोच वारसा ।

सौंदर्याचा नको अभिमान
चंद्रावरही आहेत डाग ।
विचारांचा होतो सन्मान
चांदणीलाही कुठे राग ।
Sanjay R.


निसर्गाची लीला न्यारी

अथांग इथला सागर
काठ त्यास धरतीचा ।
निसर्गाने ओढली चादर
शृंगार बघा या धरेचा ।

जिकडे तिकडे वृक्ष वेली
हिरवा कंच तिचा पदर ।
फुलांची जेव्हा होते उधळण
रंगात कुठे हरवते नजर ।

नदी वाहते घेऊन पाणी
झुळझुळ नाद गाते गाणी ।
रात्री जेव्हा होतो काळोख
चंद्र बघिनी हसते चांदणी ।

निसर्गाची लीलाच न्यारी
विश्वाची ही रचना प्यारी ।
सौंदर्याची नाहीच तुलना
बघून सारे वाटे भारी ।
Sanjay R.


हृदयात हवी जागा

आयुष्याचे कोरे पान
शब्दांनी घेतली जागा ।
प्रेम क्रोध दोन्ही तिथे
क्रोधाने दिला दगा ।
जिंकले हो प्रेम परत
हसून थोडे तुम्ही बघा ।
प्रेम सहज फुलते
हृदयात हवी जागा ।
Sanjay R.


कोरे पान

आयुष्य माझे कोरे पान
होतच नाही कसेच छान ।
हवा असेल जर मान पान
पैसा फक्त हवा नको ज्ञान ।
फुकटचा आणून आव
मारायची इथे कोरडी शान ।
हिंडा फिरा रानो रान
नाही इथे कशाची वान ।
Sanjay R.